रडीचा डाव खेळणाऱ्यांना लोळवलं, आम्ही जिंकलो! ‘लगान’च्या आठवणी ताज्या, आनंदाला उधाण

'लगान' चित्रपटात अमिर खान जसा शेवटच्या चेंडूत सामना जिंकून देतो, अगदी तसंच काही चित्र ऑस्ट्रेलियात आज बघायला मिळालं (India win test series in Australia)

रडीचा डाव खेळणाऱ्यांना लोळवलं, आम्ही जिंकलो! 'लगान'च्या आठवणी ताज्या, आनंदाला उधाण
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 2:48 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच मैदानात धूळ चारली (India win test series in Australia). कर्णधार अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने हातातून निसटणारा सामना घट्ट पकडून मालिकाही खिशात घालत, जगातील सर्वात श्रेष्ठ संघ असल्याचं दाखवून दिलं. या सामन्यात बऱ्याच अडचणी आल्या. मात्र, अंतिमत: भारतीय संघाचा विजय झाला. या विजयाने कोट्यवधी भारतीयांची मनं जिंकली आहेत. वर्णभेदी, तुच्छ शब्दांमध्ये टीका करणाऱ्या विकृत मानसिकतेवर हा भारतीय संघाचा विजय आहे. त्यामुळे हा विजय खूप खास आहे (India win test series in Australia).

टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जात आहेत. तर काही लोकांकडून अभिनेता अमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाची आठवणी काढण्यात आली आहे. ‘लगान’ चित्रपटात अमिर खान जसा शेवटच्या चेंडूत सामना जिंकून देतो, अगदी तसंच काही चित्र ऑस्ट्रेलियात आज बघायला मिळालं. त्यामुळे सोशल मीडियावर लगान चित्रपटाच्या त्या शेवटच्या क्षणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सामना जिंकल्यानंतर आम्ही जिंकलो म्हणत आख्खं गाव मैदानावर नाचायला लागतं, इतका आनंद गावकऱ्यांना होतो. अगदी तसाच आनंद आज भारतीय क्रिकेट चाहत्यांना झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव कसा खेळला?

खरं म्हणजे खेळ म्हटल्यावर खेळात पराभव किंवा विजय होणं ही सामान्य बाब आहे. मात्र, विजयासाठी समोरच्या संघातील खेळाडूंना जखमी करणं, ही विकृती आहे. हीच विकृती आज ब्रिस्बेनच्या मैदानात बघायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेझलवूडने 49 व्या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. पुजाराने हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाराचा अंदाज चुकला. त्यामुळे तो चेंडू बॅटवर न येता पुजाराच्या ग्लोव्हजवर लागला. हा फटका इतका जोरदार होता की पुजाराने हातातील बॅट फेकून दिली. मैदानातच आडवा पडला. यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला कर्णधार अजिंक्य रहाणे पुजाराच्या दिशेने धावून गेला. तसेच फिजीयोही मैदानात आले. या फटक्यामुळे पुजाराला मैदानाबाहेर जावे लागतं की काय, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली.

हाताला बसलेल्या फटक्यानंतर पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली. मात्र पुन्हा 51 व्या ओव्हरमध्ये आणखी एक प्रकार घडला. यावेळेसही हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने शॉर्ट पिच बोल टाकला. हा बोल पुजाराच्या हेल्मेटवर येऊन धडकला. हा शॉर्ट पीच चेंडू इतक्या वेगाने आला की पुजाराचा हेल्मेट फुटला. हेल्मेटचा तुकडा पडला.

भारतीय संघानंतर मीम्सचा पाऊस

संबंधित बातम्या :

लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Brisbane Test : 5 विकेट घेत कांगारुंना आस्मान दाखवणारा सिराज वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाला…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.