AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा राजकीय भूकंप? भाजप मित्रपक्षांची शिकार करणार… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता एका बड्या नेत्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाष्य केले आहे.

पुन्हा राजकीय भूकंप? भाजप मित्रपक्षांची शिकार करणार... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
BJP ShindeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 12, 2026 | 5:40 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. 2019 साली शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेत बंड झाले, एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार आमि मंत्र्यांना सोबत घेत भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठा घटना होती. त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता एका बड्या नेत्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रोहित पवारांचा मोठा दावा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.

भाजपवर निशाणा

महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.

रोहित पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आपल्या कोणत्या मित्रपक्षाची शिकार करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. रोहित पवारांचा दावा खरा ठरल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येऊ शकतो. त्यामुळे राजकारणात नेमकं काय घडणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?