AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB Score Updates and Highlights IPL 2026: मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, आरसीबीने 18 धावांनी नमवलं

| Updated on: Apr 13, 2026 | 5:09 AM
Share

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Indian Premier League 2026 Score and Highlights In Marathi: मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबीने मुंबईला पराभूत केलं. या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत खाली गेला आहे.

MI vs RCB Score Updates and Highlights IPL 2026: मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, आरसीबीने 18 धावांनी नमवलं
IPL 2026 MI vs RCB Live Score UpdatesImage Credit source: TV9

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत नाजूक स्थिती आहे. मुंबई इंडियन्सला आपल्या मोहिेमेतील चौथ्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबीने मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईला प्रत्युरात 222 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने अशाप्रकारे या मोसमातील एकूण तिसरा विजय मिळवला. आरसीबी 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 12 Apr 2026 11:51 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव

    मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीविरुद्धच्या 240 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण हे आव्हान गाठताना मुंबई इंडियन्स संघ 222 धावा करू शकला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत घसरण झाली आहे.

  • 12 Apr 2026 11:22 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : नमन धीर आऊट, मुंबईला पाचवा झटका, आरसीबी विजयाच्या दिशेने

    रसीख सलीम दार याने नमन धीर याला आऊट करत मुंबईला पाचवा झटका दिला आहे. नमनने अवघी 1 धाव केल्या. यासह आता सामना मुंबईच्या हातातून निसटत चालला आहे. तर आरसीबी विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे.

  • 12 Apr 2026 11:11 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबईला चौथा झटका, कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट

    जेकब डफी याने मुंबईला चौथा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. जेकबने कॅप्टन हार्दिक पंड्या याला आऊट करत पलटणला चौथा धक्का दिला आहे. हार्दिकने 22 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.

  • 12 Apr 2026 10:57 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : कृणालकडून सूर्याचा गेम, मुंबईला तिसरा झटका, पलटण अडचणीत

    कृणाल पंड्या याने सूर्यकुमार यादव याचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. कृणालने सूर्याला रसिख सलाम दार याच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 22 बॉलमध्ये 35 रन्स केल्या.

  • 12 Apr 2026 10:55 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : हार्दिक-सूर्या जोडी जमली, पलटणला फटकेबाजीची गरज

    मुंबईने 12 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 119 रन्स केल्या आहेत. हार्दिक पंड्या 26 आणि सूर्यकुमार यादव 33 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. मुंबईला विजयासाठी इथून 48 बॉलमध्ये 120 रन्सची गरज आहे.

  • 12 Apr 2026 10:31 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : सूयश शर्माचा दणका, मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    सूर्यश शर्मा याने मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. सूयशने आधी रायन रिकेल्टन याला आऊट केलं. त्यानंतर सूयशने तिलक वर्मा याला 1 रनवर जेकब डफी याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 12 Apr 2026 10:28 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    सूर्यश शर्मा याने रायन रिकेल्टन याला आऊट करत आरसीबीला पहिली विकेट मिळवून दिली आहे. सूयशने रायनला भुवनेश्वर कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.  रायनने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.

  • 12 Apr 2026 10:18 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबईला मोठा झटका, रोहित आऊट न होताच मैदानाबाहेर, कारण?

    मुंबईचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा आरसीबी विरुद्ध आऊट न होताच मैदनाबाहेर गेला आहे. मुंबईने 241 धावांचा पाठलाग करताना5.2 ओव्हरमध्ये 57 रन्स केल्या. मात्र पायाला त्रास होत असल्याने रोहित रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.

  • 12 Apr 2026 10:10 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : रोहित-रायनची अर्धशततकी भागीदारी, मुंबईची कडक सुरुवात

    रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने मुंबईला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. रायन आणि रोहितने 241 रन्सचा पाठलाग करताना 4.3 ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे.  रायन 34 आणि रोहित 15 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 12 Apr 2026 09:51 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रिकेल्टन मैदानात, मुंबईसमोर 241 रन्सचं टार्गेट

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने मुंबईसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 12 Apr 2026 09:33 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या वानखेडेत 240 धावा, मुंबई इंडियन्स जिंकणार?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 240 रन्स केल्या आहेत.  आरसीबीसाठी फिलीप सॉल्ट, विराट कोहली आणि कॅप्टन रजत पाटीदार या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने 34 रन्स करत फिनिशिंग टच दिला. आता मुंबई 241 रन्स करत विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 12 Apr 2026 09:30 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : जितेश शर्मा आऊट, आरसीबीला चौथा झटका

    ट्रेन्ट बोल्ट याने जितेश शर्मा याला एलबीडब्ल्यू आऊट करत आरसीबीला चौथा झटका दिला आहे. जितेशने 10 रन्स केल्या. बोल्टची ही या सामन्यातील आणि मोसमातील पहिली विकेट ठरली.

  • 12 Apr 2026 09:27 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या 19 ओव्हरमध्ये 230 धावा, गतविजेता 6 चेंडूत किती रन्स करणार?

    आरसीबीच्या 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 230 धावा केल्या आहेत. टीम डेव्हीड 26 आणि जितेश शर्मा 10 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे जितेश-टीम जोडी शेवटच्या 6 चेंडूत किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 12 Apr 2026 09:07 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : रजत पाटीदारच्या वादळी खेळीचा शेवट, आरसीबीला तिसरा झटका

    मिचेल सँटनर याने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याला आऊट केलं आहे. रजत पाटीदार याने 20 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. रजतने या खेळीत 5 सिक्स आणि 4 फोर लगावले.

  • 12 Apr 2026 08:56 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट कोहली अर्धशतकानंतर आऊट, आरसीबीला दुसरा झटका

    हार्दिक पंड्या याने विराट कोहली याला आऊट करत आपली पहिली विकेट मिळवली आहे. आरसीबी विराटच्या रुपात दुसरी विकेट गमावली. विराटने 38 चेंडूत 50 धावा केल्या.

  • 12 Apr 2026 08:52 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : कॅप्टन रजत पाटीदारची आक्रमक सुरुवात, आरसीबी द्विशतकाच्या दिशेने

    आरसीबीने फिल सॉल्ट याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन रजत पाटीदार याने विराटसोबत तडाखेदार बॅटिंग केली. रजतने यासह विराटसह आरसीबीला 14 ओव्हरमध्ये 183 धावांपर्यंत पोहचवलं आहे. रजतने 13 बॉलमध्ये 46 रन्स केल्या आहेत. तर विराट 35 बॉलमध्ये 49 रन्सवर खेळत आहे.

  • 12 Apr 2026 08:32 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : ‘लॉर्ड’ ठाकुरकडून फिल सॉल्टचा गेम, आरसीबीला पहलिा झटका

    शार्दुल ठाकुर याने मुंबईचया पहिल्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. शार्दुलने फिल सॉल्ट याला आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आहे. सॉल्टने  36 बॉलमध्ये 78 रन्स केल्या.

  • 12 Apr 2026 08:25 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट-सॉल्ट जोडीचा धमाका, पलटण विरुद्ध शतकी भागीदारी

    विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने आरसीबीसाठी शतकी भागीदारी केली आहे. विराटने मिचेल सँटनर याने टाकलेल्या नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर फोर ठोकला. यासह आरसीबीच्या सलामी जोडीने 100 धावांची भागीदारी केली. तर दुसऱ्या बाजूला मुंबई अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहे.

  • 12 Apr 2026 08:11 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : सॉल्टचा धुमधडाका, मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई, ओपनर शतकाच्या दिशेने

    फिल सॉल्ट याने मुंबई विरुद्ध तडाखेदार सुरुवात केली आहे. सॉल्टने विराट कोहली याच्यासह 8 ओव्हरमध्ये 95 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. सॉल्ट 29 बॉलमध्ये 68 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे सॉल्ट असाच खेळत राहिला तर तो सहज शतक करेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर दुसऱ्या बाजूला विराटने 19 चेंडूत 25 रन्स केल्या आहेत.

  • 12 Apr 2026 08:03 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या नावावर पावरप्ले, सलामी जोडीचा धमाका, पलटण विरुद्ध किती धावा?

    फिल सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने पावरप्ले आपल्या नावावर केला. सलामी जोडीने 6 ओव्हरमध्ये 70 रन्स केल्या. विराटने 14 चेंडूत 22 तर सॉल्टने 22 चेंडूत 47 धावा जोडल्या. तर मुंबईचे फलंदाज पावरप्लेमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले.

  • 12 Apr 2026 07:57 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट-सॉल्टची जबरदस्त सुरुवात, पलटण पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत

    विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने आरसीबीला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. या दोघांनी आरसीबीसाठी 5 ओव्हरमध्ये 65 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली.  विराट कोहली 20 आणि फिल सॉल्ट 44 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 12 Apr 2026 07:32 PM (IST)

    MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, विराट-सॉल्ट मैदानात

    मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि ट्रेन्ट बोल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

  • 12 Apr 2026 07:30 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सामन्याआधी श्रद्धांजली

    मुंबई-आरसीबी सामना सुरु होण्याआधी स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंसह उपस्थित क्रिकेट चाहत्यांकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा भोसले यांचं आज रविवारी मुंबईत वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं.

  • 12 Apr 2026 07:23 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार :

    मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.

  • 12 Apr 2026 07:22 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : आरसीबी प्लेइंग ईलेव्हन

    आरसीबी प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), टीम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि सुयश शर्मा.

  • 12 Apr 2026 07:03 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबईने टॉस जिंकला, पलटणचा बॉलिंग करण्याचा निर्णय

    मुंबई इंडियन्सच्या बाजूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नाणेेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने गतविजेत्या आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 12 Apr 2026 06:53 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्सं बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 12 Apr 2026 06:42 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : हेड टु हेड रेकॉर्ड्स

    उभयसंघात आतापर्यंत एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 19 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 15 वेळा मुंबईवर विजय मिळवला आहे.

  • 12 Apr 2026 06:22 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रियान रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

  • 12 Apr 2026 06:18 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकटेकीपर) फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जोश हेझलवुड, वेंकटेश अय्यर, सुयश शर्मा, जेकब बेथेल, रसिक सलाम दार, कनिष्क चौहान, जेकब डफी, मंगेश यादव, स्वप्नील सिंग, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा आणि सात्विक देसवाल.

  • 12 Apr 2026 06:15 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह, शेर्फेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, राज बावा, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, विल जॅक्स, मयंक रावत, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, दानिश मलेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 12 Apr 2026 06:07 PM (IST)

    MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई-आरसीबी कडवी झुंज, कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील चौथा सामना असणार आहे. मुंबईने 3 पैकी 1 तर आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला आहे. अशात कोणता संघ विजय मिळवून कमबॅक करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published On - Apr 12,2026 6:07 PM

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....