Inspiring: जॉब सोडून स्वप्न पूर्ण केलं, करोडपती झाली! 500 कोटींची मालकीण, आई वडील होते साफसफाई कामगार
नोकरी सोडली आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करायला सुरुवात केली.

जेव्हा कोणी मोठी स्वप्नं पाहतं, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. असाच काहीसा प्रकार या महिलेसोबत घडला. नुकतंच या महिलेनं आपली कहाणी लोकांना सांगितली आहे. ऑस्ट्रेलियातून आलेल्या जेन लू चे आई-वडील सिडनीमध्ये क्लिनर म्हणून काम करत होते. जेन लू ही महिला एका कंपनीत अकाउटंट म्हणून काम करायची, हिला व्यवसाय करायचा होता. नोकरी सोडली आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करायला सुरुवात केली. या महिलेने आई-वडिलांपासून लपून ऑनलाइन कपड्यांचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.
इकडे आई-वडिलांना आपल्या मुलीने नोकरी सोडलीये याबाबत काही माहितीच नाही. कारण ही महिला ऑफिसच्या वेळेत घरातून बाहेर पडत असे. मात्र, तिने नोकरी सोडली होती.
या महिलेने तिच्या स्टार्टअपची योजना आखली. गॅरेजमध्ये कपडे ठेवले आणि तिथून ते विकायला सुरुवात केली. ऑफलाइन तसेच ऑनलाइन मार्केटमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली.
आज Showpo या महिलेची कंपनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करते. त्या महिलेच्या फॅशन कंपनीची कल्पना लोकांना आवडली.
पहिल्या प्रयत्नानंतर नुकसान झालं पण तरीही महिलेने हार न मानता एवढा मोठा व्यवसाय उभा केला.आता तिचा फॅशन ब्रँड 120 देशांमध्ये ओळखला जातो.
आज आलिशान लाईफस्टाईल जगणारी ही महिला सांगते की, या कामात तिच्या बॉयफ्रेंडनेही तिला साथ दिली
500 कोटींच्या या मालकिणी कडे महागडी घरे आणि वाहने आहेत. इतकंच नाही तर 2016 मध्ये फोर्ब्सच्या यादीतही तिचं नाव आलं आहे.
