या देशात एकही मूल जन्माला नाही अशी परिस्थिती का? तीन महिन्यात एकही डिलिवरी नसल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
गेल्या वर्षी जन्माला येणाऱ्या प्रत्येक सात मुलांमागे 12 जणांचा मृत्यू झाला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर एका दिवसात सात मुले जन्माला येत असतील तर एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू होत होता. म्हणजे असेच चालू राहिले तर तिथली लोकसंख्या झपाट्याने कमी होईल.

रोम: काय वाटतं तुम्हाला सध्याची जगापुढे असणारी सगळ्यात मोठी समस्या कोणती? सगळ्यात मोठी असणारी समस्या सध्या चीन, जपान फेस करतंय. आता या यादीत इटलीचा सुद्धा समावेश झालाय. चीन आणि जपान मध्ये मुलं जन्माला यायचं प्रमाण कमी झालंय किंबहुना ते नाहीचे. ही चीन आणि जपान समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे कारण आता हे देश म्हातारे होत चाललेत. या म्हाताऱ्या होत चाललेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश झालाय. तुम्हाला वाचून धक्का बसेल की इटलीमध्ये गेल्या तीन महिन्यात एकही मूल जन्माला आलेलं नाही. तुम्हाला वाटेल ही काय इतकी मोठी समस्या आहे का? तर हो. गेल्या तीन महिन्यात एकही मूल जन्माला न येण्याच्या समस्येकडे तिथल्या पंतप्रधान नॅशनल इमर्जन्सी म्हणून बघतात. जिथे एकही मूल जन्माला आलेलं नाहीये तिथे वृद्धांची संख्या पण तर वाढत चाललीये ना? नाही म्हटलं तरी वय वाढणं थांबणार आहे का? मग देश म्हातारा होत चाललाय. या सगळ्याकडे पंतप्रधान नॅशनल इमर्जन्सी म्हणून बघतात.
इटलीने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड
अंग्रेजी न्यूज़ वेबसाइट माध्यमाच्या एका रिपोर्टनुसार. इटलीने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. पण या रेकॉर्डने इटली काय खुश नाहीये. रॉयटर्सने लिहिलंय, “नेशनल स्टैटिक्स ब्यूरो ISTAT च्या आकडेवाडीनुसार, इटलीमध्ये जानेवारी 2023 ते जून 2023 दरम्यान जितक्या मुलांचा जन्म झालाय तो दर 2022 च्या तुलनेत कमी आहे. म्हणजेच जानेवारी 2022 ते जून 2022 दरम्यान जास्त मुलांचा जन्म झाला होता. हा फरक जवळपास 3500 चा आहे.”
देश झपाट्याने म्हातारा होतोय
रिपोर्ट्स मध्ये जे समोर आलं त्यात 15 ते 49 वय असणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. ज्या महिला मुलांना जन्म देण्यास सक्षम आहेत अशा महिलांची संख्या इटली मध्ये कमी आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये ही संख्या कमी झालीये. इटलीचा हा वर्ल्ड रेकॉर्ड इतका गंभीर आहे की पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी याकडे राष्ट्रीय आणीबाणी म्हणून पाहतात. गेल्या वर्षी जन्माला येणाऱ्या प्रत्येक सात मुलांमागे 12 जणांचा मृत्यू झाला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर एका दिवसात सात मुले जन्माला येत असतील तर एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू होत होता. म्हणजे असेच चालू राहिले तर तिथली लोकसंख्या झपाट्याने कमी होईल. इटली यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढेल अशी आशा आहे पण देश मात्र झपाट्याने म्हातारा होतोय हे नक्की!