पाहावं ते अजबच! इमारत आहे की जंगल? 800 झाडं अन् 14 हजार रोपांची बिल्डिंग

इटलीची फॅशन राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिलान शहरात ही गगनचुंबी इमारत आहे. बॉस्को व्हर्टिकल असं या इमारतीचं नाव आहे. झाडं आणि रोपांमुळे ही इमारत अतिशय सुंदर दिसते.

पाहावं ते अजबच! इमारत आहे की जंगल? 800 झाडं अन् 14 हजार रोपांची बिल्डिंग
बॉस्को व्हर्टिकल बिल्डिंग
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 11:44 AM

मुंबई : आपण आपल्या घरात, बाल्कनीमध्ये, अंगनात झाडं लावतो. पण ती झालं किती असतात? एक, दोन, चार, सहा??? पण एखाद्या इमारतीत शेकडो झाडं लावल्याचं कधी ऐकीवात आहे का? तुम्ही जर शेकडो झाडं आणि हजारो रोपटी असलेली इमारत कधी पाहिली नसेल तर ही बातमी वाचा. कारण अशी एक इमारत जगात आहे, ज्यात 800 झाडे आणि 14 हजार रोपे (Trees Building) लावण्यात आली आहेत. ही जगातील सर्वात विचित्र बहुमजली इमारत आहे. एकप्रकारे या इमारती नसून जंगल असल्याचं बोललं जातं. या इमारतीची सध्या जगभर चर्चा (Viral news) आहे.

इटलीची फॅशन राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिलान शहरात ही गगनचुंबी इमारत आहे. बॉस्को व्हर्टिकल असं या इमारतीचं नाव आहे. झाडं आणि रोपांमुळे ही इमारत अतिशय सुंदर दिसते. शिवाय या झाडांमुळे ही पर्यावरणासाठीही वरदान आहे. इटालियन वास्तुविशारद आणि शहर नियोजक स्टेफानो बोएरी यांनी या भव्य इमारतीत जंगल निर्माण करण्याची संकल्पना आणली. 2014 मध्ये त्यांनी यावर काम करायला सुरूवात केली. तेव्हापासूनच ही इमारत जगभरातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनली.

स्टेफानो बोएरीने शेजारी-शेजारी असलेल्या दोन इमारतींमध्ये झाडं आणि रोपटी लावण्याचं ठरवलं. या दोन इमारतींमध्ये 800 हून अधिक झाडं आणि 14 हजारांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. स्टेफानोने आपल्या अनोख्या संकल्पनेतून जगाला दाखवून दिलं की, शहरात राहूनही तुम्ही तुमची झाडांची आवड जोपासू शकता आणि त्यांचं संगोपन करू शकता. जेणे करून पर्यावरणाचा रक्षण होईल.

हे सुद्धा वाचा

स्टेफानो बोएरी 2007 मध्ये दुबईला गेल्यानंतर पाहिलं की तिथे उंचच उंच इमारती तयार केल्या जात आहेत. यासाठी काच, धातू आणि सिमेंटचा सर्वाधिक वापर केला जात आहेत. सूर्याची किरणे त्यांच्यावर पडली की उष्णतेचं प्रमाण वाढतं. मागच्या 7 वर्षांत दुबईत बांधलेल्या इमारतींमध्ये 94 टक्के काच बसवूनच बांधण्यात आल्या आहेत. हे सगळं पाहून त्यांचं मन हेलावून गेलं. त्यांना वाटलं की उष्णता रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचं जतन करण्यासाठी आपण झाडं लावायला हवीत. त्यातूनच ही इमारत उभी राहिली.

या अनोख्या प्रयोगाची जगभर चर्चा तर आहे, शिवाय लोकांचं आरोग्यही चांगलं राहातं. लोकांना भरपूर ऑक्सिजन मिळतो. यासोबतच पशूपक्षी आणि फुलपाखरंही या इमारतीत येत राहतात. त्यामुळे लोकांना आनंदी राहतात.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.