Japanese Baba Vanga : जपानी बाबा वेंगाची ते भयावह भाकीत, जुलै महिन्यात जगावर महासंकट, हे 3 देश होणार उद्ध्वस्त
Japanese Baba Vanga : जपानची बाबा वेंगा रियो तात्सुकी हिने 2025 साठी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे जगातील या देशात काय होणार याविषयी चर्चांना पेव फुटले आहे. समुद्राशेजारील देशांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काय आहे ही भविष्यवाणी?

जापानची गूढ मंगा कलाकार आणि कथित भविष्यवेत्ता रिओ तात्सुकी हिला जापानची बाबा वेंगा असे म्हणतात. तिचे “The Future I Saw” हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकात तिने भविष्यातील अनेक घटनांचे भाकीत केले आहे. तिच्या या पुस्तकाने पूर्वोत्तर देशांमध्ये खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी या पुस्तकात अनेक वर्षांपूर्वी काही अशा घटना वर्तवल्या की, त्या प्रत्यक्षात घडल्या आणि त्यामुळे रियो ही भविष्यवेत्ती म्हणून पुढे आली. आता जुलै 2005 मध्ये तिच्या भाकिताने पुन्हा चिंता निर्माण केली आहे.
काय आहे पुस्तकातील दावा
रिओ तात्सुकी हिच्या पुस्तकात काही दावे केले आहेत. जुलै 2025 मध्ये जपानमधील दक्षिण महासागरात मोठा ज्वालामुखी फुटेल. समुद्र खवळेल. समुद्रातून पाणी उसळेल. भयंकर त्सुनामी होईल. या ज्वालामुखीमुळे जपानचे दक्षिण द्वीप, तैवानचा किनारपट्टा, इंडोनेशियाचे काही भाग प्रभावित होतील. तात्सुकीचा दावा आहे की, 2011 मधील फुकुशिमा त्सुनामीपेक्षा पण ही त्सुनामी घातक असेल. यामध्ये हजारो लोकांना प्राण गमवावे लागतील. तर अनेक जण जायबंदी होतील असा दावा करण्यात आला आहे.
The Future I Saw पुस्तकाची चर्चा
1999 मध्ये “The Future I Saw” हे पुस्तक बाजारात आले होते. त्यावेळी हे मनोरंजक आणि फँटसी असल्याचे बोलले गेले. पण 2011 मध्ये जपानमध्ये त्सुनामी आली आणि सर्वांच्या रिओच्या पुस्तकावर उड्या पडल्या. विशेष म्हणजे या पुस्तकातील तारीख आणि तिने केलेले वर्णन तंतोतंत या घटनेशी जुळले. त्यामुळे रिओ रात्रीतून लोकप्रिय झाली. या पुस्तकात तिने जे वर्णन केलेले आहे. अथवा तिने जो दावा केला आहे, त्याविषयी लोकांच्या मनात साशंकता असली तरी एक अनामिक भीती पण आहे.

रिओ तात्सुकी
काय केले आपत्तीचे वर्णन?
या पुस्तकात रिओ हिने भविष्यातील नैसर्गिक संकटांची तारीख आणि तिचे स्वरूप याविषयीचे वर्णन करून ठेवले आहे. तिने या पुस्तकात काही नैसर्गिक आणि काही मानव निर्मित घटनांचा उल्लेख केला आहे. अर्थात तिने या गोष्टींसाठी कोणतेही वैज्ञानिक प्रमाण दिले नाही.
भीतीने अनेकांनी बुकिंग केलं रद्द
जुलै 2025 मध्ये या त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे जपान, इंडोनेशिया आणि तैवान येथे जाणाऱ्या पर्यटकांनी धसका घेतला आहे. अनेकांनी ट्रॅव्हल एजन्सींना फोन करून जुलै महिन्यातील बुकिंग एकतर पुढे ढकलले आहे अथवा ते रद्द केलेले आहे. हे बुकिंग 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. इस्टर हॉलीडेच्या बुकिंगमध्ये पण मोठी घसरण झाली आहे. पर्यटकांच्या मते रिओ तात्सुकीच्या भविष्यवाण्या यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ते कोणताही धोका स्वीकारू शकत नाही. अर्थात विज्ञानाच्या कसोटीवर त्याला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला नाही.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.
