AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: कलियुगातील हा कृष्णा कोण? ज्याच्या एका हाकेने शेकडो गायी येतात धावत

Viral Video: खरी संपत्ती आणि समाधान हाच... चिमुकल्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद सर्व काही सांगत आहे. ज्याच्या एक हाकेवर शेकडो गायी येतात धावत... व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Viral Video: कलियुगातील हा कृष्णा कोण? ज्याच्या एका हाकेने शेकडो गायी येतात धावत
फाईल फोटो
| Updated on: Oct 10, 2025 | 2:12 PM
Share

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका चिमुकल्याच्या व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ दिसणाऱ्या मुलाचं नाव किरण असं असून तो 9 – 10 वर्षांचा असेल. व्हिडीओमध्ये करण पुढे धावताना दिसत आहे, तर त्याच्या मागे त्याच्या एका हाकेवर शेकडो गायी धावत असल्याचं दिसून येत आहे. हे दृश्य पाहून लोकांना द्वापर काळातील भगवान श्रीकृष्णाची आठवण आली. किरणचा व्हिडिओ हा फक्त एक साधा क्लिप नाही तर मानव आणि प्राण्यांमधील प्रेम, भक्ती आणि विश्वासाचे एक सुंदर उदाहरण आहे.

कोण आहे हा चिमुकला?

किरण कोणत्या श्रीमंत घरातील नाही. तो साधारण मुलगा आहे आणि गावात राहतो. त्याने स्वतःचं आयुष्य पूर्णपणे गायींची सेवा करण्यासाठी समर्पित केलं आहे. तो दररोज सकाळी पाच वाजता उठतो, गायींना चारा घालतो, त्यांचे दूध काढतो आणि नंतर शाळेला निघून जातो. संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर तो पुन्हा गायींकडे परततो.. त्याच्या चेहऱ्यावर कधीच थकवा दिसत नाही, दिसतं तर फक्त आणि फक्त समाधान… ‘गायींमध्ये माझं जीवआहे… घर तर सर्वांचं असतं. पण आमचं घरत गायी आहेत..’ असं किरण म्हणतो…

गावातील लोकं देखील म्हणतात की, गायी देखील किरणला ओळखतात. जेव्हा किरण त्यांच्या जवळ जातो, तेव्हा सर्व गायी शांत होतात. मोठ्या शिंगांच्या गायी देखील त्याच्याकडे प्रेमाने पाहतात. किरण त्यांच्यामध्ये न घाबरता फिरतो, जणू काही ते कुटुंबातील सदस्य आहेत. तो हसतो आणि म्हणतो की गायी कधीही कोणाचे नुकसान करत नाहीत.

किरण याचं कुटुंब…

किरणचे कुटुंब मालदारी परंपरेचा एक भाग आहे, जिथे लोक पिढ्यानपिढ्या गायींची काळजी घेत आहेत आणि चरत आहेत. किरण याच्या कुटुंबियांकडे स्वतःच्या जागा – जमीनी नाहीत. त्यांची खरी संपत्ती म्हणजे गायी… किरण याचे वडील म्हणतात, ‘आम्ही वर्षभर गायींसोबत राहतो. कधी 500 तर कधी 700 किलोमिटर गायींना चरायला घेवून जातो. हवामान काहीही असो – पाऊस, उष्णता किंवा थंडी – आम्ही गायींना कधीही एकटं सोडत नाही… असं देखील किरण याचे वडील म्हणाले.

इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.