Video : समुद्र किनारी फिरायला आवडतं? तर लाटांप्रमाणे हलणाऱ्या या पुलाला नक्की भेट द्या…

कर्नाटकातील उडुपीमध्ये एक नवा पूल तयार करण्यात आला आहे. इथल्या मालपे बीचवर हा पूल तयार करण्यात आला आहे. यावर गेल्यानंतर आपण लाटांवर स्वार झालोय की काय असं वाटायलं लागतं.

Video : समुद्र किनारी फिरायला आवडतं? तर लाटांप्रमाणे हलणाऱ्या या पुलाला नक्की भेट द्या...
लाटांच्या अनुसार हलणारा पूलImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:41 PM

मुंबई : फिरायला जायला तर कुणाला नाही आवडतं… तेही जर समुद्र किनारी जायचं असेल तर आपलं मन एका झटक्यात तयार होतं. आता अश्यातच समुद्र किनारी फिरायला जायला आवडणाऱ्यांसाठी एक नवा पर्याय निर्माण झालाय. तो म्हणजे हलता पूल… हा पूल आहे कर्नाटकातील उडुपीचा. इथल्या मालपे बीचवर  (Malpe Beach) हा पूल तयार करण्यात आला आहे. कर्नाटकातील राज्यातील पहिल्या तरंगत्या पुलाचं (moving bridge) उद्घाटन काल (शुक्रवारी) उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उडुपीचे आमदार के. रघुपती भट आणि उपायुक्त एम. कुर्मा राव उपस्थित होते. उडुपीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा वाढवण्यासाठी हा पूल उपयुक्त ठरेल. तीन स्थानिक उद्योजकांनी 80 लाख रुपये खर्चून हा 100 मीटर लांब पूल उभारला आहे.

हलता पूल

कर्नाटकातील उडुपीमध्ये एक नवा पूल तयार करण्यात आला आहे. इथल्या मालपे बीचवर हा पूल तयार करण्यात आला आहे. यावर गेल्यानंतर आपण लाटांवर स्वार झालोय की काय असं वाटायलं लागतं.

पर्यटनासाठी किती रूपये मोजावे लागणार?

या ठिकाणी जर तुम्हाला पर्यटनासाठी जायचं असेल तर प्रति व्यक्ती 100 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला लाइफ जॅकेट देण्यात येईल. हे घालून 15 मिनिटे या पुलावर आनंद घेता येईल.पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुलावर 10 लाईफ गार्ड आणि 30 लाईफबॉय रिंग असतील.

आपल्या उद्घाटनपर भाषणात रघुपती भट म्हणाले, “माल्पे समुद्रकिनाऱ्याला आधीच जागतिक मान्यता मिळाली आहे. साहसी जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दुरून समुद्रकिनाऱ्याला भेट देत आहेत. हा समुद्रकिनारा परदेशी लोकांना आकर्षित करतो. आणि आता तो सुट्टीसाठी आणखी आकर्षक ठिकाण बनला आहे. एवढेच नाही तर पर्यटकांना सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे प्रकल्पाच्या सुरूवातीला येथे 20-25 जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.