AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच की काय, कारची काच साफ करणारे हात करतायेत तुमचं पेटीएम फास्टॅग खातं साफ! काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य? कसला ही घोटाळा नसल्याचा FASTag चा दावा

तुमच्या कारच्या विंडस्क्रीनवरील फास्टॅग खरंच सुरक्षित आहे का? कार साफ करणारे हात कारच्या काचेवर चिटकवलेल्या फास्टॅग स्कॅन करुन खात्यातील रक्कम चोरी करतायेत का? याविषयीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील काय सत्य? चला तर जाणून घेऊयात..

खरंच की काय, कारची काच साफ करणारे हात करतायेत तुमचं पेटीएम फास्टॅग खातं साफ! काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य? कसला ही घोटाळा नसल्याचा FASTag चा दावा
काय आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 25, 2022 | 5:19 PM
Share

स्मार्ट घड्याळ (Smart Watch) घालून विंडस्क्रीन (Windscreen) साफ ​​करणा-या चिमुकल्या हातांनी हातसफाई केली. चक्क पेटीएम फास्टॅग (Paytm FASTag) खात्यातील रक्कम चोरली, असा दावा करणारा व्हिडिओ (Viral Video) तुम्ही ही पाहिला का? या व्हायरल व्हिडिओने सध्या देशभरात काय धुमाकूळ घातलाय म्हणून सांगू. ज्याच्या त्याच्या जीवाला घोर लागला आहे. कारण कार घरापेक्षा सार्वजनिक ठिकाणीच जास्त उभी असते. जर कोणी ही असं स्मार्ट वॉच घालून तुमच्या फास्टॅगमधील रक्कम उडवायला लागलं म्हणजे तुमचं तर दिवाळं निघेल. या व्हिडिओनंतर कारचालक सैरभैर झाले आहेत. फास्टॅगच्या तंत्रज्ञानावर अनेकांनी संशय व्यक्त केला. एक माणूस एवढा दावा करतो म्हणजे काय. त्याची दखल अनेकांनी घेतली नी फास्टॅग बाबाला जाब विचारला. आज स्मार्ट वॉच वापरली उद्या कोणी मोबाईलमधील कोड स्कॅनर अथवा इतर डिजिटल गॅझेटच्या (Digital gadgets) माध्यमातून चालता बोलता कोणीही फास्टॅग खात्यातून रक्कम उडवेल. तेव्हा या दाव्याचा पडताळा आपण करुयात. कारच्या विंडस्क्रीनवरील फास्टॅग खरंच सुरक्षित आहे का? कार साफ करणारे हात कारच्या काचेवर चिटकवलेल्या फास्टॅग स्कॅन करुन खात्यातील रक्कम चोरी करतायेत का? याविषयीचा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील काय सत्य? चला तर जाणून घेऊयात..

काय आहे व्हिडिओत

समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ फिरत आहे. त्यात स्मार्ट घड्याळ घातलेला एका मुलगा कारची विंडस्क्रीन साफ करताना दिसत आहे. या सफाई दरम्यान तो काचेवर लावलेल्या पेटीएम फास्टॅगवरुन घड्याळ फिरवतो आणि खात्यातून रक्कम वळती होते, असा दावा करण्यात आलेला आहे. घड्याळातील स्टिकर स्कॅनरद्वारे हा प्रकार सुरु असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन व्हिडिओ सादरकर्ता करताना दिसून येतो. घड्याळ हातात घालून तुमच्या ही खात्यातून रक्कम वळती होण्याचा प्रकार घडू शकतो, असा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे.

काय आहे फास्टॅग?

FASTag ही प्रीपेड रिचार्जेबल टॅग सेवा आहे. ही सेवा टोल भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट स्वीकारते. कारच्या विंडशील्डवर स्थापित FASTag, स्कॅनर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान वापरुन स्कॅन करण्यात येतो. ज्यामुळे वापरकर्त्याच्या बँक खात्यातून आपोआप रक्कम कपात होते. या तंत्रज्ञानामुळे टोलनाक्यावरील लांबच लांब रांगा कमी झाल्याचा आणि वाहनधारकांच्या वेळेचा अपव्यव टळल्याचा दावा करण्यात येतो.

फास्टॅगने दावा खोडला

FASTag ने अशा कोणत्याही घोटाळ्याची शक्यता फेटाळून लावली. फास्टॅगद्वारे होणारे व्यवहार फक्त नोंदणीकृत व्यापाऱ्यांद्वारेच करता येतात. संबंधित टोल नाका आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटर यांच्याकडील तंत्रज्ञानाद्वारेच ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे अन्य कोणत्याही स्कॅनर, अॅप अथवा यंत्राद्वारे फास्टॅगमधून रक्कम काढता येत नसल्याचा दावा फास्टॅगने केला आहे. तसेच व्हायरल व्हिडिओतील दावा ही  फेटाळून लावला आहे. कोणतेही अनधिकृत उपकरण NETC FASTag वर कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकत नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा फास्टॅगने केला आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.