AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माऊंट एव्हरेस्टजवळ सापडतायत किंग कोब्रा? दीड महिन्यात सापडले 10 साप, ग्लोबल वार्मिंग की आणखी काय ?

सपाटप्रदेशात सर्प दंशांनी दरवर्षी 2,700 लोक मरतात. यात बहुतांशी महिला आणि मुलांचा समावेश आहे. हा आकडा The Lancet सारख्या प्रतिष्ठित मेडिकल जर्नलमध्ये छापला गेला आहे. तज्ज्ञांच्या मते याची संख्या याहून अधिक आहे. कारण अनेक प्रकरणांची तक्रार केली जात नाही.

माऊंट एव्हरेस्टजवळ सापडतायत किंग कोब्रा? दीड महिन्यात सापडले 10 साप, ग्लोबल वार्मिंग की आणखी काय ?
| Updated on: Jun 08, 2025 | 5:41 PM
Share

साप शक्यतो उष्ण प्रदेशात आढळतात. परंतू आता माऊंट एव्हरेस्ट जवळ देखील साप सापडू लागल्याने खळबळ उडाली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूत हिरव्या गार खोऱ्यात गेल्या दीड महिन्यांपासून १० विषारी साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. या ९ तर किंग कोब्रा आणि एक मोनोकल कोब्रा यांचा समावेश आहे.

विषारी सर्प शक्यतो उष्ण आणि सपाट प्रदेशात आढळतात. परंतू आता ते थंडगार प्रदेशात सापडू लागल्याने खळबळ उडाली आहे.नेपाळची काठमांडूपासून सरळ रेषेत १६० किमी अंतरावर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेट आहे. येथे विषारी सांप सापडल्याने पर्यावरण तज्ज्ञ हैराण झाले आहेत. काठमांडू पोस्टच्या नुसार या क्रोबांना गुपालेश्वर, भांज्यांग, सोखोल आणि फुलचौक सारख्या भागातून रेस्क्यु करण्यात आले आहे. हे साप घर, अंगणात आणि एवढेच काय निवासी विभागात शिरले आहेत. वन विभाग आणि सर्पमित्रांद्वारे त्यांना पकडण्यात आले आहे. आणि त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले आहे. काही गावकऱ्यांनी तर या सापांची अंडी आणि घरे देखील जंगलात पाहीली आहेत.

येथे सांप आता अधिवास करु लागले..

तज्ज्ञांच्या मते विषारी सांप केवळ डोंगराळ भागातच घुसलेले नाहीत. तर येथील वातावरणात सरमिसळून गेले आहेत. यास कारण वाढते तापमान म्हटले जात आहे. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम आता नेपाळच्या पर्वतमय प्रदेशावर देखील होत आहे. येथील कमाल तापमान आता सपाट प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. जे 0.05 डिग्री सेल्सियस प्रति वर्ष आहे.याचमुळे पठारी प्रदेशात आढळणारे साप आता पर्वतात आढळू लागले आहेत.

ट्रक सोबत आले की आणले ?

हे साप शक्यतो लाकडे आणि भुशासोबत ट्रकद्वारे आले असावेत असे सापाचे रेस्क्यू ट्रेनर सुबोध आचार्य यांनी म्हटले आहे. परंतू ते आता कायमस्वरुपी आता येथेच राहात आहेत. किंग कोब्रा आणि मोनोकल कोब्राला दक्षिणकाली, स्युचातार, गोकर्णा, गोदावरी आणि मकवानपुरच्या सिसनेरी परिसरातून या सापांना रेस्क्यू केलेले आहे.

सरकारची काय तयारी?

नेपाल सरकारने 2030 पर्यंत सापाच्या दंशाने होणारे मृत्यू 50% टक्क्यांपर्यंत कमी करण्यात लक्ष्य ठेवले आहे. याअंतर्गत पर्वत परिसरात उपचार केंद्र देखील उघडण्यात आली आहेत. भारतातून क्वाड्रिवेलेंट एंटी-वेनम आयात केले जाते.ज्यापासून सर्पदंशावर लस तयार केली जाते. परंतू पिट वायपर सारख्या स्थानिक सर्प दंशांवर अजूनही खात्रीलायक उपचार नाहीत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.