AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2030 नंतर माणसाचा मृत्यूच होणार नाही, माजी शास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणी; दिलेलं कारण वाचलंच पाहिजे…

रे कुर्झवेल यांचा दावा आहे की 2030 पर्यंत नॅनोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या साह्याने मानव अमर होऊ शकतो. त्यांच्या मते, नॅनोबॉट्स शरीरातील खराब पेशी दुरुस्त करून वृद्धत्व रोखतील. त्यांनी आधी केलेली अनेक भाकिते खरी ठरली असल्याने हा दावा लक्षणीय आहे. एआयचीही यात महत्त्वाची भूमिका असेल, असा त्यांचा विश्वास आहे. डिजिटल अमरत्वाचाही विचार केला जात आहे.

2030 नंतर माणसाचा मृत्यूच होणार नाही, माजी शास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणी; दिलेलं कारण वाचलंच पाहिजे...
माजी शास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणीImage Credit source: social media
| Updated on: Aug 02, 2025 | 2:39 PM
Share

येत्या काही वर्षांत मानवी मृत्यू ही भूतकाळातील गोष्ट होईल का? माजी गुगल अभियंता आणि प्रसिद्ध भविष्यवेत्ता रे कुर्झवेल यांनी असा दावा केला आहे. त्यांनी अलीकडेच म्हटलं आहे की 2030 सालापर्यंतच , म्हणजे आजपासून फक्त 5 वर्षांच्या आत, मानव अमर होऊ शकतो. ही साधी गोष्ट नाही, कारण कुर्झवेल यांनी आतापर्यंत 147 भाकिते केली आहेत, त्यापैकी 86 टक्क्यांपेक्षा जास्त भाकितं बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.

कुठून सुरू झाला हा दावा ?

रे कुर्झवेल यांच्या प्रसिद्ध पुस्तक The Singularity is Near मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लिहिलं की येत्या काळात तंत्रज्ञान इतके विकसित होईल की मानव कधीही न मरणारी प्रजाती बनू शकेल. या पुस्तकात त्यांनी विशेषतः जेनेटिक्स (Genetics), नॅनोटेक्नॉलॉजी (Nanotechnology) आणि रोबोटिक्सचा (Robotics) उल्लेख केला आहे – ज्यांना ते अमरत्वाची गुरुकिल्ली मानतात.

टेक्नॉलॉजी कसे देईल अमरत्व ?

कुर्झवेल यांच्या मते, तांत्रिक विकासाचा वेग इतका वेगवान झाला आहे की आपण लवकरच नॅनोबॉट्स, म्हणजेच सूक्ष्म रोबोट्स तयार करू शकू, जे मानवी शरीरात राहून काम करतील. हे नॅनोबॉट्स :

– शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करेल. – वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावेल – रोगांशी लढेल, अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारांशीही लढतील.

हे छोटे रोबोट शरीरात तरंगतील आणि सतत त्याची दुरुस्ती करत राहतील. त्यामुळे अशा प्रकारे आपलं शरीर म्हातारं होणार नाही आणि माणूस कायमचा जगू शकेल.

AI आणि कॉम्प्युटरचीही असेल मुख्य भूमिका

कुर्झवेल यांचा असा विश्वास आहे की 2029 सालापर्यंत कॉम्प्युटर हे मानवांइतकेच बुद्धिमान होतील. असे स्मार्ट कॉम्प्युटर मानवी मेंदू चांगले समजू शकतील, तसेच कॉपी करू शकतील आणि विचारही करू शकतील. भविष्यात, मानव आणि एआयमधील ही दरी हळूहळू संपेल.

कोणती भाकितं ठरली खरी ?

रे कुर्झवेल फक्त दावा करत नाहीत तर त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी, अनेक भाकितं आधीच खरी ठरली आहेत :

– 1990 साली ते म्हणाले होते की 2000 पर्यंत कोणताही माणूस बुद्धिबळात संगणकाला हरवू शकणार नाही.

हे 1997 मध्ये खरे ठरले, तेव्हा आयबीएमच्या ‘डीप ब्लू’ संगणकाने जागतिक बुद्धिबळ विजेता गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला.

– 1999 मध्ये त्यांनी भाकीत केले होते की 2023 पर्यंत फक्त 1000 डॉलर्स किमतीचा लॅपटॉप मानवी मेंदूइतकी माहिती साठवू शकेल.

हेही खरं ठरलं आहे – आजचे AI -आधारित संगणक आणि लॅपटॉप अत्यंत वेगवान आणि बुद्धिमान आहेत.

– 2010 सालापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात जलद वायरलेस इंटरनेट उपलब्ध होईल

हेही आजचं वास्तव आहे. जेव्हा 4जी हे भारतातील खेड्यांमध्ये पोहोचलंय आणि 5 जी सामान्य होतंय.

आगामी वर्षांत काय होणार ?

रे कुर्झवेल यांच्या मते, पुढील काही वर्षांत :

– नॅनोटेक्नॉलॉजी सामान्य होईल

– एआय आणि मानव एकमेकांशी जोडले (Fusion) जातील

– डिजिटल अमरत्वाचा (Digital Immortality) युग येईल – म्हणजेच, तुमचा मेंदू क्लाउडमध्ये सुरक्षित असेल, जो पुन्हा डाउनलोड करता येईल.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.