निसर्गाचा अजब खेळ, लहानपणीच चिमुकलीला आलं म्हातारपण, ‘या’ प्रकरणात असं होणं शक्य
Rare Disease : 10 लाख लोकांमध्ये एकाला असतो हा दुर्मिळ आजार, ज्यमध्ये व्यक्ती त्याच्या वास्तविक वयापेक्षा खूपच मोठी दिसते... जाणून घ्या कोणता आहे तो आजार

Viral Story: आपल्या भोवताली काही गोष्टी अशा घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण असतं… असंच काही एका चिमुकलीसोबत देखील झालं आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे, जन्माला येताच बाळाला म्हातारपण आलं आहे? सोशल मीडियावर अशी एक घटना व्हायरल होत आहे, जी जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… ही घटना आहे युकेमधील यॉर्कशायर येथील रहिवासी झारा हार्टशॉर्न हिची… जिला लोकं प्रेमाने नाही तर, तिची खिल्ली उडवत आजी म्हणून हाक मारतात… वयाने लहान असलेल्या झारा हिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यामुळे तिची त्वचा निस्तेज झाली होती.
झारा हिचं लहानपण फार कठीण होतं. जेव्हा ती शाळेत जायची तेव्हा इतर विद्यार्थी तिला चिडवायचे आणि आजी आली… आजी आली… असं म्हणायचे. झारा घराबाहेर निघाल्यानंतर लोकं तिला वाईट प्रकारे बघायचे… एवढंच नाही तर, आईची मोठी बहीण असं देखील झारा हिला म्हणायचे… झारा हिला नक्की कोणता आजार होता जाणून घेऊ..
10 लाख लोकांमध्ये एकाला असतो हा आजार
झारा हिला प्रचंड दुर्मिळ (Rare Disease) आजार आहे. लिपोडिस्ट्रॉफी (Lipodystrophy) असं त्या आजाराचं नाव आहे… हा आजार 10 लाख लोकांमध्ये एकाला असतो.. यामुळे व्यक्ती त्याच्या वास्तविक वयापेक्षा खूपच मोठी दिसते. झाराची आई ट्रेसी हिलाही अशीच स्थिती होती, परंतु तिची लक्षणं सौम्य होती.
वयाच्या 8 व्या वर्षी 60 सारखी दिसते…
झारा हिचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, मुलगी निरोगी जन्माला आली. पण झारा 4 वर्षांची झाल्यानंतर तिची स्किन लटकू लागली… वयाच्या 8 व्या वर्षी ती 60 वर्षांच्या वृद्धासारखी दिसू लागली होती. झारा आरशात स्वतःला पाहून रडायची. तिच्याशी कोणीही बोलत नव्हतं. तिला असंही वाटायचं की तिच्याशी कोण लग्न करेल.
धोकादायक आहे हा रोग
लिपोडिस्ट्रॉफीमुळे पीडित व्यक्तीचं शरीरच विद्रूप होत नाही तर त्यांचं हृदय, यकृत आणि मूत्रपिंड देखील खराब होतात. झारा केवळ 14 वर्षांची असताना तिच्या मूत्रपिंडांना त्रास होऊ लागला. मग, वयाच्या 16 व्या वर्षी, एक चमत्कार घडला. जेव्हा झाराची व्यथा माध्यमांमध्ये आली आणि डॉक्टरांनी तिला पाहिलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते तिच्यावर नवीन शस्त्रक्रिया करतील.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर झारा हिची 3 किलोची अतिरिक्त चरबी काढली. जेव्हा झाराच्या चेहऱ्यावरून पट्ट्या काढल्या गेल्या तेव्हा तिच्या आईला अश्रू अनावर झाले. शस्त्रक्रियेनंतर ती एका सामान्य तरुणीसारखी दिसत होती. तिच्या आईनेही शस्त्रक्रिया केली आणि आता दोघेही सामान्य जीवन जगत आहेत.
