AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: अच्छे से तेल भरना…छोट्या पुष्पाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, कडक है साला!

पेट्रोल पंपावर महिला कर्मचारी आहे, तिला हा लहानगा म्हणतो, नीट इंधन भर, एक थेंब पण कमी नाही यायला हवा. त्यावर महिला कर्मचाऱ्यालाही हसू येतंय.

Viral: अच्छे से तेल भरना...छोट्या पुष्पाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, कडक है साला!
इन्स्टाग्रामवर या लहानग्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे
| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 4:49 PM
Share

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मोठ्यांच्या चुकांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी कुठल्या अपघाताचे तर कधी लहानग्यांच्या करामतींचे…अशाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ आहे एका लहानग्याच्या डायलॉगचा. पुष्पा नावाचा हा लहानगा पेट्रोल पंपावर पोहचला आहे. जिथं गाडीमध्ये इंधन भरायचं आहे, तिथंच हा सगळा संवाद घडताना दिसत आहे.

छोटा पुष्पा नावाने हे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, ज्याला 8 हजाराहून जास्त फॉलोअर आहेत. या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा छोटा पुष्पा कारच्या फ्रंट सीटवर बसलेला दिसतो. व्हिडीओ क्रिएटरच्या हाती गाडीचं सारथ्य आहे. पेट्रोल पंपावर महिला कर्मचारी आहे, तिला हा लहानगा म्हणतो, नीट इंधन भर, एक थेंब पण कमी नाही यायला हवा. त्यावर महिला कर्मचाऱ्यालाही हसू येतंय.

यावरच तो थांबत नाही, तर पुढे विचारतो, कितने का डालोगी? तर महिला कर्मचारी म्हणते, तुम्ही सांगाल, तितकं भरेल. या छोट्याचा हा कॉन्फिडन्स कमाल आहे. तर लहानगा म्हणतो 200 चं टाका..त्यावर व्हिडीओ क्रिएटर म्हणतो नाही 500 चं सांग.

या छोट्याला हेही माहित नाही की गाडी पेट्रोलवर चालणारी आहे की डिझेलवर. जेव्हा महिला कर्मचारी या लहान मुलाला विचारते, सर पेट्रोल की डिझेल? तर हा लहानगा म्हणतो पेट्रोल, त्यानंतर व्हिडीओ क्रिएटर त्याला करेक्ट करतो. ही गाडी डिझेलवर असल्याचं सांगतो.

व्हिडीओ पाहा:

डिझेल असल्याचं कळाल्यावर, हा पुन्हा आपल्या शैलीत बोलू लागतो की डिझेल डिझेल…एक्स्क्युझ मी…हा सगळा संवाद नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेला दिसतो आहे.

या व्हिडीओला तब्बल 2 लाखांहून अधिक लोकांना लाईक केलं आहे. तर हजाराहून जास्त लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या लहानग्याची तारीफ केली आहे. तर काहींना हा मुलगा अति बोलत असल्याचंही वाटत आहे. मात्र असं असलं तरी हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.