Lalbagh Raja Viral Video : अभिनेत्रीने ठेवली लालबाग राजाच्या चरणी ठेवली ५०० रूपयांची नोट, २ सेकंदात झाली गायब, त्या व्हिडिओची चर्चा
अभिनेत्री मधू शाह यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी ५०० रुपयांची नोट अर्पण केली, मात्र काही क्षणांनी एका व्यक्तीने ती नोट उचलताना दिसल्याने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

नवसाला पावणारा राजा म्हणजे लालबागचा राजा. गणेशोत्सवात लालबाग गल्ली भाविकांनी सजलेली असते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भक्त देश विदेशातून येत असतात. बॉलिवूड कलाकारांपासून क्रिकेटविश्वापर्यंत अनेकजण बाप्पााच्या चरणी नतमस्तक होतात. यंदाही राजाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत. त्यामुळे राजाच्या चरणी भरगोस दान पडत आहे. पण सध्या राजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे आणि कारण आहे बाप्पााच्या चरणी चढवलेले पैसे.
राजाच्या दानातून ५०० रूपये क्षणात लंपास
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये टॉलिवूड अभिनेत्री मधू शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बाप्पााच्या चरणी ५०० रूपयांचे दान, नोट अर्पण केली. इथपर्यंत सगळ ठिकं होतं पण पुढच्या क्षणी कॅमेरात काहीतरी वेगळंच कैद झालं.
काही क्षणांतच नोट लंपास?
मधू शाह मागे वळताच एक व्यक्ती ती ५०० रूपयांची नोट पटकन उचलाताना दिसत आहे. त्यानंतर ती नोट जवळच्या कापडाखाली किंवा त्यामागे ठेवली जात असल्यांचही दिसत आहे. काही क्षणाचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले आहे.
Mumbai, Maharashtra: Actress Madhoo Shah visited the Lalbaugcha Raja pandal in Mumbai and offered prayers pic.twitter.com/3M2SxxIiE4
— IANS (@ians_india) September 21, 2026
व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रश्न आले समोर
व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पैसे अर्पण केल्यानंतर नोट इतक्या लवकर का उचलली ती नोट कोणी उचलणारी व्यक्ती नेमकी कोण होती. तो मंडळाचा कार्याकर्ता होता का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
खरं अद्याप समोर आलेले नाही
व्हिडिओमध्ये नोट उचलताना व्यक्ती दिसत असली तरी केवळ या काही सेकंदाच्या फुटेजवरून ती चोरी करण्यात आली असा निष्कर्ष काढता येत नाही. नोट का हटवण्यात आली? ती व्यक्ती लालबागचा राजा मंडळाशी संबंधित होती का याची अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
ती अभिनेत्री कोण
मधू शाह यांनी १९९१ मध्ये फूल और कांटे मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर रोजा या चित्रपटातून तिला मोठी ओळख मिळाली. हिंदीसोबतच त्यांनी तमिळ, तेलूगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
