OMG! पाणीपुरी विकून खरेदी केली थार; आनंद महिंद्रासुद्धा कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही

पाणीपुरी विकून एका तरुणीने चक्क महिंद्रा थार विकत घेतली आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हा व्हिडीओ शेअर करत तरुणीचं कौतुक केलं आहे.

OMG! पाणीपुरी विकून खरेदी केली थार; आनंद महिंद्रासुद्धा कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही
OMG! पाणीपुरी विकून खरेदी केली थारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 3:16 PM

मुंबई : 24 जानेवारी 2024 | महिंद्रा थार या गाडीची लोकांमध्ये किती क्रेझ आहे, याची उदाहरणं अनेकदा पहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर एका पाणीपुरी विकणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बी.टेकचं शिक्षण घेतलेल्या तरुणीने पाणीपुरी विकून जमा केलेल्या पैशांमध्ये महिंद्रा थार विकत घेतली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रासुद्धा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. या तरुणीबद्दल आनंद महिंद्रा काय म्हणाले ते पाहुयात..

महिंद्रा थार ही एक अशी एसयूव्ही आहे, ज्याची क्रेझ संपूर्ण देशभरात पहायला मिळते. तापसी उपाध्याय नावाच्या तरुणीने बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र तिने कोणतीही नोकरी न करता फक्त पाणीपुरी विकून थार घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वत: आनंद महिंद्रा यांनी तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित ऑफ-रोड गाडीबद्दल सांगितलं. ते म्हणाले की ‘या गाडीने लोक अशा जागी जाऊ शकतात, जिथे ते पहिले कधी जाऊ शकत नव्हते. ही गाडी लोकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी देते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतात. त्यामुळे मला हा व्हिडीओ का आवडला ते तुम्हाला आता नीट समजू शकतं.’ अशी पोस्ट लिहित त्यांनी तापसीचा व्हिडीओ शेअर केला.

हे सुद्धा वाचा

आनंद महिंद्रा यांची पोस्ट

महिंद्रा थार ही गाडी तिच्या फीचर्समुळे विशेष चर्चेत असते. ही गाडी ऑफ रोड एसयूव्ही रिअर व्हील ड्राइव्ह आणि फोअर व्हील ड्राइव्ह अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. रिअर व्हील ड्राइव्हमध्ये 1.5 लीटर डीझेल इंजिनची पॉवर मिळते, जी 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. याशिवाय 2.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. ज्यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.

थार 4WD व्हेरिएंटमध्ये 2.2 लीटर डीझेल इंजिनची पॉवर देण्यात आली आहे. याशिवाय 2.0 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा पर्यायसुद्धा मिळेल. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये मिळतील. महिंद्रा थार ही देशातील सर्वांत सुरक्षित ऑफ-रोड एसयूव्हीपैकी एक आहे. या गाडीला GNCAP कार क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. थारची एक्स शोरुम किंमत 11.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

Non Stop LIVE Update
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.