Makeup artistनं लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली; यूझर्स म्हणतायत, विश्वासच नाही बसत

Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. एका मेकअप आर्टिस्टचा (Makeup artist) व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून (Art) अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

Makeup artistनं लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली; यूझर्स म्हणतायत, विश्वासच नाही बसत
आपल्या कलेतून मेकअप आर्टिस्टनं वाहिली लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 10:43 AM

Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण जग शोक करत आहे. सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. अनेक लोक त्यांनी गायलेली गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत, तर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याच प्रकारामध्ये एका मेकअप आर्टिस्टचा (Makeup artist) व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून (Art) अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीस्थित मेकअप आर्टिस्ट दीक्षिताचा आहे. ज्यामध्ये तिने मेकअपच्या मदतीने स्वत:ला लता मंगेशकरसारखा लूक दिला आहे. मेकअप आर्टिस्टचे हे कौशल्य पाहून अनेकजण थक्क झाले. दीक्षिताने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. जी सध्या सोशल मीडियावर झपाट्याने चर्चेत आहे.

अनोखे कौशल्य

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दीक्षिता आधी लता मंगेशकर यांचा फोटो दाखवते, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 1972 साली आलेल्या ‘शोर’ या हिंदी चित्रपटातील ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे वाजते आहे. मेकअप आर्टिस्टला पाहून दीक्षिताने स्वतःला लता मंगेशकर यांच्यासारखे बनवले. त्यांचे हे अनोखे कौशल्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

‘विश्वासच बसत नाही’

21 हजारांहून अधिक लाइक्स या व्हिडिओला आहेत. त्यात वाढच होत आहे. त्याचवेळी लोक त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने लिहिले, की त्याचा यावर विश्वास बसत नाही. लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारीला (रविवारी) सकाळी 8.12 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. मल्टीऑर्गन निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये दाखल होत्या, मात्र 6 फेब्रुवारीला त्यांनिी जगाचा कायमचा निरोप घेतला.

आणखी वाचा :

‘रत्न संपले की जगण्यामध्ये मजा राहत नाही’, कीर्तनात काढली Lata Mangeshkar यांची आठवण; Video होतोय Viral

Tribute to Lata Mangeshkar : वाळूतून शिल्प साकारत लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली, पाहा Video

#LataMangeshkar : ऐ मेरे वतन के लोगों… ITBP कॉन्स्टेबलनं लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली, पाहा Video

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.