AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 ते 5 ऑफिस, दर तासाला खायचा डब्बा; तरुणाचा व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात अनेकांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. मात्र, एका तरुणाचं रुटीन याच्या अगदी उलट आहे. हा तरुण 9 ते 5 या ऑफिस टाईम मध्ये जवळपास दर तासाला काही ना काही खातो.

9 ते 5 ऑफिस, दर तासाला खायचा डब्बा; तरुणाचा व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
तरुणाचा व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल! Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 15, 2026 | 12:39 PM
Share

रोजची 9 ते 5 ऑफिसची ड्युटी म्हटलं की कामाचा व्याप, ठरलेला लंच ब्रेक आणि पुन्हा कामाला सुरुवात, असं चित्र डोळ्यांसमोर येतं. पण कल्पना करा, एखादा कर्मचारी 8 ते 9 तासांच्या शिफ्टमध्ये दर तासाला काही ना काही खात असेल, तेही अगदी पराठे, मॅकरोनीपासून फळं आणि समोशांपर्यंत! तर मग साहजिकच प्रश्न पडतो, एवढं खाण्यासाठी वेळ मिळतो तरी कसा आणि काम कधी करतो? सध्या अशाच एका तरुणाच्या हटके ऑफिस फूड रुटीनची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, त्याच्या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. नीरज भाटिया असं या तरुणाचं नाव आहे. तो इन्स्टाग्रामवर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे १४ हजार फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या एका व्हिडीओला २० मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. त्याच्या या भन्नाट फूड रुटीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

टिफिनचे अनेक डबे अन् खाण्याचं वेळापत्रक

व्हिडीओच्या सुरुवातीला नीरज टिफिनचा थर घेऊन दिसतो. त्यासोबत फळं आणि काकडीही आहे. त्यानंतर सुरू होतं त्याचं खाण्याचं वेळापत्रक. नीरजच्या या फूड रुटीनमध्ये सकाळी ९ वाजता पनीर पराठ्याने सुरुवात होते. त्यानंतर सकाळी १० वाजता मॅकरोनी, तर ११ वाजता काळे चणे खाताना दिसतो. दुपारी १२ वाजता फळं खातो. दुपारी १.३० वाजता जेवणात तो भात, डाळ आणि सलाड खाताना दिसतो. तर दुपारी २.३० वाजता पाणीपुरी आणि ३.३० वाजता ग्रीन टी आणि संध्याकाळी ४.३० वाजता समोसे खाताना दिसतो.

पहा व्हिडीओ-

नेटकऱ्यांना पडला एकच प्रश्न!

नीरजचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. इतक्या कमी अंतराने वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वेळ कसा मिळतो, दिवसभर इतकं खाल्ल्यानंतर काम कधी करतो, असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. काही जणांनी दिवसभर डेस्कवर बसून काम करताना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळतो का, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली आहे.

Follow Us
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे