AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीच्या काही ! 70 किलोचे केळं जेव्हा मालकालाच 4 कोटीला पडतात, पण मग असं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वीन्सलँडमध्ये (Queensland) झाडावरून केळी तोडताना एक शेती कामगार जखमी झाला. यानंतर जे झाले ते अतिशय गंमतीचे होते, कारण अपघातानंतर शेती कामगाराने केलेल्या कृतीनंतर तो थेट करोडपती झाला आहे. जाणून घ्या कामगाराने असे काय केले ज्याने तो थेट करोडपती झाला.

काहीच्या काही ! 70 किलोचे केळं जेव्हा मालकालाच 4 कोटीला पडतात, पण मग असं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 2:08 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वीन्सलँडमध्ये (Queensland) झाडावरून केळी तोडताना एक शेती कामगार जखमी झाला. यानंतर जे झाले ते अतिशय गंमतीचे होते, कारण अपघातानंतर शेती कामगाराने केलेल्या कृतीनंतर तो थेट करोडपती झाला आहे. जाणून घ्या त्या कामगाराने असे काय केले ज्याने तो थेट करोडपती झाला. तुम्हाला माहीत आहे का शेतातून फळे आणि भाज्या उचलण्याचे कामही धोकादायक असू शकते.  ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील शेतात काम करणाऱ्या मजुराचे शेतामध्ये काम करत असताना नशिबच बदलून गेले. त्याच झालं असं की हा मजूर शेतात केळी गोळा करत होता, दरम्यान तो एका अपघातात जखमी झाला. नंतर मजुराने त्याच्या मालकावर खटला भरला आणि तो खटला जिंकल देखील.

नक्की काय झाले होते त्या दिवशी ?

ही घटना कुकटाऊनजवळील एका शेतात घडली. येथे लॉंगबॉटम नावाचा एक मजूर झाडांपासून केळी तोडण्याचे काम करत होता. जून 2016 मध्ये, एल अँड आर कॉलिन्स फार्ममध्ये काम करत असताना, तो केळ्याच्या मोठ्या घडासह पडला आणि गंभीर जखमी झाला. द केर्न्स पोस्टच्या अहवालानुसार, जेमीवर एक मोठे केळीचे झाड आणि केळ्याचा मोठा गुच्छ पडला होता, ज्यामुळे तो जखमी झाला होता.

कामगाराने मालकाविरोधात दाखल केला खटला

जेमी केळीचे झाड आणि केळी पडल्यानंतर कामावर परत येऊ शकला नाही. यानंतर, त्याने कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगत कंपनीच्यामालकावर खटला दाखल केला. या खटल्यामध्ये केळ्यांचे जड घड कसे हाताळावे याचे प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नाही. अशी तक्रार करण्यात आली आहे . झाडे अनपेक्षितपणे उंच होती आणि केळी देखील उंचीवर होती. जेमीने त्याच्या उजव्या खांद्यावर केळ्यांचा घड ठेवला आणि केळ्यांच्या जास्त वजनामुळे तो त्याच्या उजव्या बाजूला जमिनीवर पडला. जेव्हा त्याला कुकटाऊनमधील रुग्णालयात आणण्यात आले, त्या घटनेनंतर तो कामावर परतू शकला नाही.

मालकाला झाले 4 कोटींचे नुकसान

कोर्टाने कामगाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपल्या निर्णयात म्हटले आहे की, जेमी 70 किलो केळी घेऊन पडला होता. या अपघातानंतर त्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करता आले नाही. म्हणून न्यायालयाच्या वतीने, जेमीला $ 502,740 म्हणजेच त्याच्या कंपनीला 4 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

इतर बातम्या

वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा!

High Heels Side Effects : हाय हिल्स घालताय?, सावधान!; जाणून घ्या त्याचे तोटे

दृष्टी गेली पण मेहनत सोडली नाही, पर्याय शोधला अन् कामाले लागले, Video पाहाच!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.