VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न, भला मोठा फणा काढला, पळताभुई थोडी

सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी कुणाचं लक्ष वेधून घेईल सांगता येत नाही. सध्या सापाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा साधासुधा साप नाही तर किंग कोब्रा आहे. सापाचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो.

VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न, भला मोठा फणा काढला, पळताभुई थोडी
King Cobra

मुंबई : सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी कुणाचं लक्ष वेधून घेईल सांगता येत नाही. सध्या सापाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा साधासुधा साप नाही तर किंग कोब्रा आहे. सापाचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्यातच जर किंग कोब्रा असे तर मग न बोललेलंच बरं. किंग कोब्राचं विष वेगाने पसरतं, त्यामुळे जीवावरही बेतू शकतं. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक व्यक्ती किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

ही व्यक्ती सरपटत निघालेल्या किंग कोब्राची शेपटी पकडते. मात्र त्याचवेळी भला मोठा किंग कोब्रा फणा काढून समोरच उभा राहतो. ज्या वेगाने कोब्रा मागे वळतो, ते पाहता, बघणाऱ्यांची पाचावर धारण बसते. जो मनुष्य किंग कोब्रा पकडत आहे, त्याचा हातातील काठीही खाली पडते.

सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सापाला कशा पद्धतीने रेस्क्यू करु नये, खासकरुन किंग कोब्राला असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं सांगितलं जातं.

जी व्यक्ती साप पकडत आहे, त्याचं नाव अशोक आहे, तो साप पकडण्यात तज्ज्ञ आहे. व्हिडीओत जो साप दिसतो तो 14 फूट लांबीचा असल्याचं सांगितलं जातं.

या सापाला रेस्क्यू केल्यानंतर जंगलात सोडण्यात आलं. सापांपासून ठरावीक अंतर ठेवणं गरजेचं आहे, असं एका युजरने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तर सापांशी खेळ करु नका, त्यांचा जीव घेऊ नका, अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

VIDEO :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI