
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनचा उल्लेख केला जातो. दररोज हजारो प्रवासी या लोकलने प्रवास करत असतात. पण कधीकधी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये वादही होताना दिसतात. अशीच एक घटना सेंट्रल लाइनवरील गर्दीच्या लोकल ट्रेनच्या डब्यात घडली आहे. या डब्ब्यात दोन महिला गटांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
17 सेकंदांचा हा व्हायरल व्हिडीओ गर्दीच्या डब्यात सहा महिलांमध्ये झालेला वाद दाखवत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला, जी कॅमेऱ्याच्या फ्रेमबाहेर आहे, दुसऱ्या गटातील प्रवाशांना शिवीगाळ करताना ऐकू येते. वादात सहभागी असलेली एक महिला म्हणते, “मुंबईत राहायचे असेल तर मराठी बोला, नाहीतर बाहेर निघा.” दुसरा महिलांचा गटही या वादात सहभागी झाल्याचे दिसते.
वाचा: ज्याला हिंदी शिकायची त्याने जरुर शिका, पण…; स्वप्नील जोशीने मांडलं परखड मत
Maharashtra Language Row: Mumbai की सेंट्रल रेलवे Local ट्रेन के लेडीज कोच में शुक्रवार शाम Marathi vs Hindi Controversy को लेकर तीखी बहस छिड़ गई। सीट को लेकर शुरू हुआ ये मामूली विवाद देखते ही देखते भाषाई टकराव में बदल गया… #mumbailocaltrain #marathi #uddhavthackerayspeech… pic.twitter.com/IpDWaBMSl0
— DD News UP (@DDNewsUP) July 20, 2025
रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, ही घटना सेंट्रल रेल्वेच्या लेडीज डब्यात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याचे ‘इंडिया टुडे’ने नमूद केले आहे. मुंबईच्या गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये शाब्दिक वाद आणि किरकोळ भांडणे सामान्य असली, तरी महाराष्ट्रातील सध्याच्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा वाद मराठी भाषेवरून तीव्र झाला.
भाषा वाद
महाराष्ट्रात अलीकडेच मराठी भाषेच्या सक्तीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सारख्या पक्षांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उचलला आहे.
अलीकडेच, मुंबईच्या विक्रोली येथील एका दुकानदारावर गुरुवारी मराठी समाजाचा अपमान करणारा व्हॉट्सअॅप स्टेटस टाकल्याबद्दल MNS कार्यकर्त्यांनी कथितपणे हल्ला केला. याचप्रमाणे, ठाण्यातील एका खाद्यपदार्थांच्या स्टॉल मालकावर मराठी न बोलल्याने MNS कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच, मुंबईच्या मीरा रोड येथील एका दुकानदारावर आणि एका ऑटोरिक्षा चालकावर मराठी न बोलल्याने मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.