Video | लाकडी फळीच्या मदतीने भारी जुगाड, पण मध्येच खेळ बिघडला, दुचाकी थेट पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लाकडी फळीच्या मदतीने दुचाकी नेण्याच्या प्रयत्न करणे व्हिडीओतील लोकांना चांगलेच महागात पडले आहे.

Video | लाकडी फळीच्या मदतीने भारी जुगाड, पण मध्येच खेळ बिघडला, दुचाकी थेट पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल
bike-jugaad
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 4:45 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लोकांनी लावलेल्या जबरदस्त जुगाडाचे असतात. तर काही व्हिडीओंमध्ये लोकांची करामत दाखवलेली असते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा अशाच एका डोकॅलिटीचा आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लाकडी फळीच्या मदतीने दुचाकी नेण्याच्या प्रयत्न करणे व्हिडीओतील लोकांना चांगलेच महागात पडले आहे. (men trying to move bike with the help of Wooden plank drowned in river funny video went viral on social media)

लाकडी फळीच्या मदतीन दुचाकीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पुलावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका लाकडी फळीचा उपयोग केला जात असल्याचे आपल्याला दिसतेय. या लाकडी फळीच्या माध्यमातून लोक पुलावर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जात आहेत. दरम्यान, व्हिडीओमध्ये तीन माणसे एक दुचाकी घेऊन आले आहेत. ही तीन माणसे त्यांनी आणलेल्या दुचाकीला पुलावरुन दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

संतूलन बिघडल्यामुळे दुचाकी पाण्याती बुडाली

यावेळी ठेवण्यात टाकण्यात आलेल्या लाकडी फळीचा उपयोग केला जातोय. त्यांनी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या लाकडी फळीवर दुचाकी आणली आहे. दुचाकी तसेच दोन माणसांच्या ओझ्यामुळे व्हिडीओतील लाकडी फळी वाकत आहेत. ही फळी तुटण्याची शक्यता असल्यामुळे एका माणसाने दुचाकीला सोडून दिले आहे. मात्र, ऐनवेळी दुचाकी सोडून दिल्यामुळे तसेच संतूलन बिघडल्यामुळे ही दुचाकी थेट खाली नदीमध्ये जाऊन पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. दुचाकी सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या नादामध्ये छोट्याशा चुकीमुळे ती थेट पाण्यात पडली आहे. हा सर्व प्रकार पाहून नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | इंजेक्शन पाहून घाबरली, सुई टोचताच मुलांसारखं लागली रडायला, महिलाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला, महिलांनी शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO: महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल

(men trying to move bike with the help of Wooden plank drowned in river funny video went viral on social media)