Video : बेभान कोब्रा माकडावर तुटून पडला, थक्क करणारी झुंज पाहिलीत का?
माकड झाडावर आसरा शोधण्यासाठी गेले होते. त्या झाडावर एक खोल खड्डा होता. या खड्ड्यात आपल्याला राहता येऊ शकते असा विचार करून माकड त्या झाडावर चढले आणि त्या खड्ड्यात डोकावून पाहिले. मात्र त्या जागेवर अगोदरच पायथॉन लपून बसलेला होता. तो आराम करत असताना माकडाने येऊन त्याला त्रास दिल्याने साप फारच आक्रमक झाला.

Snake And Monkey Fight : पृथ्वीवर अनेक चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या पृथ्वीतलावर असे काही चमत्कारिक प्राणी आहे, जे पाहून आपण अचंबित होतो. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला त्याच्या संरक्षणासाठी काही शक्ती दिलेल्या आहेत. यात साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो आपल्या संरक्षणासाठी दंश करतो. त्याचे विष एकदा शरीरात गेले की समोरच्या प्राण्याचा झटक्यात जीव जातो. तसे अनेक प्रसंग आतापर्यंत समोर आलेले आहेत. कदाचित याच कारणामुळे माणूस सांपांना खूप घाबरतो. लोक साप दिसताच त्याला मारून टाकतात. काही साप विषारी नसतात. सापाच्या रौद्र रुपामुळे त्याला सगळेच घाबरतात. दरम्यान, सध्या जंगलातील एक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
सापाचा आक्रमपणा पाहून सगळेच अचंबित
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे नेमकेपणाने समजू शकलेले नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक माकड आणि साप यांची झुंज दाखवली आहे. रागाने बेभान झालेला साप माकडावर अक्षरश: तुटून पडला आहे. सापाचा हाच आक्रमकपणा सर्वांना अचंबित करून टाकतोय. दुसरीकडे अतिशय चपळ असणारे माकड मात्र सापाच्या रागापुढे हतबल झाले आहे. आपला जीव वाचवण्यासाठी माकडे प्राणपणाने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र सापाच्या ताडीतून त्याला काही सुटता येत नाहीये.
नेमकं काय घडलं? सापाने हल्ला का केला?
मिळालेल्या माहितीनुसार माकड झाडावर आसरा शोधण्यासाठी गेले होते. त्या झाडावर एक खोल खड्डा होता. या खड्ड्यात आपल्याला राहता येऊ शकते असा विचार करून माकड त्या झाडावर चढले आणि त्या खड्ड्यात डोकावून पाहिले. मात्र त्या जागेवर अगोदरच पायथॉन लपून बसलेला होता. तो आराम करत असताना माकडाने येऊन त्याला त्रास दिल्याने साप फारच आक्रमक झाला. माकडाने डोकावून पाहताच सापाने त्याच्यावर थेट हल्ला केला. सापाने माकडाचे नाक, चेहरा आपल्या जबड्यात पकडला. सापाच्या तावडीतून सुटण्याचा माकड पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र सापाने आपल्या जबड्यात त्याला एवढे घट्ट धरून ठेवलेय की माकडाचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
व्हिडीओ इन्स्टाग्रामवर करण्यात आलाय पोस्ट
दरम्यान, अनेक प्रयत्न करून माकड सापाच्या तावडीतून सुटले. मात्र यात माकड रक्तबंबाळ झाले. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर नेचर ब्रुटल या खात्यावर पोस्ट करण्यात आला असून माकड आणि सापाच्या लढाईचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. सध्या या व्हिडीओची सगळीडे चर्चा होत आहे.
