Video: धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यातून आई-मुलाला वाचवलं, वनाधिकाऱ्यांच्या शौर्याचं सोशल मीडियावर कौतुक, हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ

एक महिला तिच्या मुलासह धबधब्यात अडकली. त्यानंतर रेस्क्यू टीम कसा जीव धोक्यात घालून आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी उतरली. आता या रेस्क्यु टीमवर देशभरातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Video: धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यातून आई-मुलाला वाचवलं, वनाधिकाऱ्यांच्या शौर्याचं सोशल मीडियावर कौतुक, हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ
वन अधिकाऱ्यांनी शौर्य दाखवत आई-मुलाची सुटका केली
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 11:10 AM

आपल्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येतात. गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर थक्क व्हाल. हे प्रकरण तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील आहे. इथं अनैवारी धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली, त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर बनली की,  एक महिला तिच्या मुलासह धबधब्यात अडकली. त्यानंतर रेस्क्यू टीम कसा जीव धोक्यात घालून आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी उतरली. आता या रेस्क्यु टीमवर देशभरातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Mother baby who stuck anaivari waterfalls forest rangers who save their life)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका बाजूला पाण्याचा जोरदार प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला निसरडा दगड दिसतो आहे. यावर एक महिला आपल्या मुलासह अडकलेली दिसत. मग दोन लोक शौर्य दाखवतात आणि आई आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात गुंततात. हे लोक त्या निसरड्या खडकावर उतरतात. आई आणि मुलाला वाचवतात, पण परत येताना दोघेही घसरून पाण्यात पडतात. हा क्षण अतिशय भयानक आहे. दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. पण सुदैवाने पाण्यात पडल्यानंतर ते दोघेही पोहत किनाऱ्यावर सुखरुप पोहचतात.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी आई आणि वन अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खरंच! आईपेक्षा या जगात कोणीही नाही.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमचा सलाम.’ याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही पाहा:

पॉर्न वेबसाईटवर गणिताचे लेक्चर घेऊन वर्षाला 2 कोटींची कमाई, तैवानच्या शिक्षकाची सोशल मीडियावर चर्चा

VIDEO: करवा चौथसाठीची डाबरची जाहिरात वादात, लेस्बियन नात्याचा उल्लेख, वादानंतर डाबरकडून माफी!

 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.