Video : सासू सावरतीय सुनबाईची साडी, शेकडो पोरी म्हणतात, “अश्शी सासू हवी गं बाई…!”

Video : सासू सावरतीय सुनबाईची साडी, शेकडो पोरी म्हणतात, अश्शी सासू हवी गं बाई...!

हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. यात सासू आपल्या सुनेची साडी सावरतेय. हा व्हीडिओ ashisharma1710 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 22, 2022 | 7:32 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) लग्नाचे विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. असाच लग्नातला एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. यात सासू-सुनेचं प्रेम दिसतंय. हा व्हीडिओ प्रत्येक सासू आणि सुनेने पाहायला हवा. नवविवाहित वधू आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नाला उपस्थित आहे. यावेळी तिच्यासोबत तिची सासूही हजर आहे. पण नवी नवरी असल्याने तिला आपली साडी सावरणं तितकंस जमत नाहीये. त्यामुळे तिची सासू तिची साडी सावरतेय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल (viral video) होतोय. अनेकांनी याला पसंती दर्शवली आहे.

व्हायरल व्हीडिओ

लग्नातला एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. यात सासू-सुनेचं प्रेम दिसतंय. हा व्हीडिओ प्रत्येक सासू आणि सुनेने पाहायला हवा. नवविवाहित वधू आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नाला उपस्थित आहे. यावेळी तिच्यासोबत तिची सासूही हजर आहे. पण नवी नवरी असल्याने तिला आपली साडी सावरणं तितकंस जमत नाहीये. त्यामुळे तिची सासू तिची साडी सावरतेय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. अनेकांनी याला पसंती दर्शवली आहे.

हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. यात सासू आपल्या सुनेची साडी सावरतेय. हा व्हीडिओ ashisharma1710 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला ‘सासू माँ’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक तरूणींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सासू असावी तर अशी!, अशी कमेंट अनेक तरूणांनी केली आहे. तर मलाही अशी सासू हवी, अशी कमेंट एका तरूणींनी केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें