‘मृत्यू’ची तारीखच सांगते ही रहस्यमयी विहीर; डोकावताना लटपटतात हातपाय, कुठे आहे ते ठिकाण?
death prediction : भारतात विविध रहस्यमयी ठिकाणं आहेत. त्यासंबंधीत अनेक मान्यता आहे. त्या ठिकाणांशी अनेक चमत्कार जोडल्या गेले आहेत. मग अशा ठिकाणांची उत्सुकता पण असते. भाविक लाबलांबून येतात. त्या ठिकाणची लोकप्रियता वाढते.

आपल्या देशात अनेक आशा जागा आहेत की ज्या रहस्यमयी आहेत. या जागा चमत्कारिक म्हणून लोकप्रिय आहे. या जागा उत्सुकता आणि श्रद्धा निर्माण करतात. वाराणसीमध्ये पण असेच एक रहस्यमयी ठिकाण आहे. चंद्रकूप विहीर असे त्याचे नाव आहे. ही रहस्यमयी विहीर सिद्धेश्वरी मंदिराच्या आत आहे. असं म्हटल्या जातं की, या विहिरीत डोकावल्यास तुमचा मृत्यू कधी होईल, याची कल्पना मिळते. दुरून दुरून लोक येथे येतात. येथे आल्यावर साहाजिकच काही जण थेट विहिरीत डोकावतात. तर काही जण या विहिरीचं तोंड देखील पाहत नाहीत. काय आहे या विहिरीशी संबंधित ते रहस्य? तुम्हाला माहिती आहे का?
मिळतात मृत्यूचे संकेत
ही रहस्यमयी विहीर मृत्यूचे संकेत देते, असे मानल्या जाते. जर एखाद्या व्यक्तीला या विहिरीत त्याची सावली दिसली नाही तर तो येत्या 6 महिन्यात मरण पावणार, अशी या ठिकाणची मान्यता आहे. जर तुमची सावली या विहिरीतील पाण्यात दिसली तर त्या व्यक्तीवर संकट नाही असे मानण्यात येते. काहींच्या मते ही अंधश्रद्धा आहे तर काहींनी असे घडल्याचा दावा केला आहे.
चंद्रकूप विहिरीची पौराणिक कथा काय?
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, वाराणसीत चंद्रकूप विहिरीची निर्मिती चंद्रदेवाने केली होती. चंद्र देवाने अनेक वर्ष भगवान शंकराची कठोर तपस्या केली. त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्यांना रहस्यमयी शक्तींचे वरदान दिले. ही विहिर अनेकांच्य श्रद्धेचे केंद्र स्थान झाली आहे. या विहिरीच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होते अशी मान्यता आहे. या मंदिरात पौर्णिमा आणि अमवस्येच्या दिवशी खास पूजा करण्यात येते. भाविक भक्त दूर दूरुन चंद्रश्वेर लिंगाचे दर्शन करण्यासाटी येतात.
अजून एक असेच स्थान
दुसरीकडे जवळच धर्मेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे पण अशीच एक विहीर आहे. येथे भगवान शिव आणि यमराज हे या ठिकाणी विराजमान आहेत, अशी मान्यता आहे. धर्मेश्वर महादेव मंदिर फार जूने आहे. तिथली विहीर ही धर्मराजाने बांधल्याची मान्यता आहे. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याअगोदरची ही विहीर आहे. ज्या व्यक्तीला या विहिरीत त्याची सावली दिसत नाही, त्याचा पुढील सहा महिन्यात मृत्यू होतो असे मानल्या जाते.
डिस्क्लेमर: ही धार्मिक मान्यतेनुसार दिलेली माहिती आहे. टीव्ही 9 याविषयीचा कोणताही दावा करत नाही.
