Video : जिद्द आणि चिकाटी हवी तर ‘अशी’, 95व्या वर्षी ‘या’ आजी आहेत लाखोंच्या मालकीण; वाचा यशोगाथा…

| Updated on: Feb 21, 2022 | 11:31 AM

Women empowerment : वयाच्या 90व्या वर्षी हरभजन कौर (Nani Harbhajan Kaur) यांनी असे काही करून दाखवले जे मोठ्या उद्योगपतींनाही (Businessman) करता आले नाही. होय, चंदीगडच्या (Chandigarh) आजींनी लोकांना असे पदार्थ दिलेत, की त्याची चव लोकांना पसंत पडली.

Video : जिद्द आणि चिकाटी हवी तर अशी, 95व्या वर्षी या आजी आहेत लाखोंच्या मालकीण; वाचा यशोगाथा...
95 वर्ष वयाच्या यशस्वी उद्योजिका हरभजन कौर
Follow us on

Women empowerment : हिंमत आणि जिद्द असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर काही नवे करण्याची भावना कायम राहते. वय झाले म्हणजे काहीही करू शकत नाही, असे नाही. काही दिवसांपूर्वी एक गरीब व्यक्ती वयाच्या 60व्या वर्षी मॉडेल बनल्याची बातमी वाचली होती. नेमक्या याच संकल्पनेतून वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी आपल्या आवडीचं पालन करायला सुरुवात केली आणि गेल्या 5 वर्षात नानी माँनी (Nani Harbhajan Kaur) असे काही करून दाखवले जे मोठ्या उद्योगपतींनाही (Businessman) करता आलं नाही. होय, चंदीगडच्या (Chandigarh) आजींनी लोकांना असे पदार्थ दिलेत, की त्याची चव त्यांच्या तोंडात कित्तेक दिवस रेंगाळेल. आता त्यांच्या हाताने बनवलेली बेसन बर्फी खाल्ल्यानंतरच लोकांची भूक भागते. ही यशोगाथा वाचल्यानंतर तुम्हालाही काहीतरी करण्याचे वेड लागेल.

कुटुंबातील सदस्यही कामात सामील

चंदीगडमध्ये लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या 95 वर्षीय हरभजन कौरबद्दल सांगत आहोत. ज्यांनी वयाच्या 90व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा विचार केला होता. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाली आणि मग नानी यांनी आपला व्यवसाय सुरू केला. बेसनाची बर्फी बनवून नानी विकू लागल्या. घरच्यांनी बाजारात जाऊन विक्री केली तर चांगला भाव मिळाला. मग हळूहळू लोक आपापल्या घरी येऊन या पदार्थाची मागणी करू लागले. कुटुंबातील सदस्य त्यांच्या कामात सामील झाले आणि सोशल मीडियावर मार्केटिंग करू लागले. नानीच्या हातची बेसन बर्फी लोकांना आवडू लागली आणि मग कमाई होऊ लागली.

उद्योगपती आनंद महिंद्रांनीही केलंय कौतुक

काही काळानंतर जेव्हा बाजारात मागणी वाढू लागली तेव्हा हरभजन्स (Harbhajan’s) ब्रँड नाव ठेवण्यात आले आणि केवळ बेसन बर्फीच नाही तर लोणचे, बदाम सरबत, भोपळ्याची आईस्क्रीम, पिठाची पंजिरी, डाळीची खीर, टोमॅटोची चटणी आदी पदार्थ बनवले जाऊ लागले. उत्पादनाचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग कुटुंबातील सदस्य करतात आणि आता ते केवळ चंदीगड आणि पंजाबच्या अनेक शहरांमध्येच नव्हे तर अॅमेझॉनवरूनदेखील ऑनलाइन ऑर्डर केले जाऊ शकते. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही 95 वर्षीय हरभजन कौर यांचे कौतुक केले. त्यांनी हरभजन कौर यांना ‘Entrepreneur of the year‘ ही पदवी दिली आहे.

पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मिळालेल्या माहितीनुसार, हरभजन कौर यांच्या पतीचे 2008मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून त्या मुलीच्या घरी राहू लागल्या. घरातील सर्वजण काम करत होते, त्यामुळे त्यांना एकटे वाटत होते. मग त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी काम करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या लाखो रुपयांच्या मालक आहेत आणि सर्वोत्तम व्यावसायिक महिला बनल्या आहेत.

आणखी वाचा :

Sinhagad fort : शिवरायांना ‘असं’ही वंदन, सिंहगड किल्ल्याची भ्रंमती करत दिली माहिती; Video viral

Biggest roll : ‘हा’ पदार्थ पाहुन तोंडाला पाणी सुटेल, पण घरी करू शकणार आहात का? पाहा Video

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo