Pineapple Barfi Recipe : खास प्रसंगी बनवा ही स्वादिष्ट अननस बर्फी, जाणून घ्या रेसिपी!

Pineapple Barfi Recipe : खास प्रसंगी बनवा ही स्वादिष्ट अननस बर्फी, जाणून घ्या रेसिपी!
अननस

आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खाण्यासाठी प्रचंड आवडतात. मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या नेहमीच्या बर्फीला कंटाळून तुम्ही घरच्या घरीही अनोखी आणि स्वादिष्ट अननस बर्फी बनवू शकता. ही बर्फी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीलाही चांगली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 10, 2021 | 9:02 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खाण्यासाठी प्रचंड आवडतात. मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या नेहमीच्या बर्फीला कंटाळून तुम्ही घरच्या घरीही अनोखी आणि स्वादिष्ट अननस बर्फी (Pineapple Barfi) बनवू शकता. ही बर्फी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीलाही चांगली आहे. ही स्वादिष्ट अननस बर्फी बनवण्यासाठी आपल्याला अननस, नारळ, कस्टर्ड पावडर, साखर आणि तूप लागणार आहे. चला जाणून घेऊयात घरच्या-घरी ही बर्फी कशी तयार करायची.

अननस बर्फीचे साहित्य

-तूप – 2 कप

-साखर – 1 कप

-कस्टर्ड पावडर 1 कप

-अननस – 1 कप

-नारळ – 1 कप

अननस बर्फी तयार करण्याची पध्दत-

स्टेप – 1

एका पातेल्यात 1 वाटी साखर आणि दीड वाटी पाणी टाका. साखर पूर्णपणे वितळली आणि मिश्रण थोडे गरम झाल्यावर गॅस बंद करा. तुम्हाला येथे साखरेचा पाक बनवण्याची गरज नाही फक्त साखर पाण्यात विरघळवा.

स्टेप – 2

नारळ आणि अननसाचे तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा. आता मिश्रण तयार करण्यासाठी चांगले मिसळा. पूर्ण झाल्यावर अननस आणि नारळाचा रस मिळविण्यासाठी मिश्रण गाळून घ्या.

स्टेप – 3

आता अननस-नारळाच्या रसात कस्टर्ड पावडर नीट मिसळा. चांगले एकजीव झाल्यावर हे मिश्रण गरम साखरेच्या मिश्रणात मिक्स करा. मध्यम आचेवर ठेवा.

स्टेप – 4

मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. 2 चमचे तूप घालून पुन्हा चांगले मिसळा. मिश्रण घट्ट होईद्या.

स्टेप – 5

तुपाने चांगले ग्रीस केलेल्या साच्यात काढा. 1 तास सेट होऊ द्या आणि नंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवा. आता आपली अननस बर्फी तयार आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें