AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Norway Mayor : भारतात आला नॉर्वेचा मेयर; महागडी कार सोडून रिक्षा चालवतोय, टपरीवर चहा पिताेय चहा, कारण काय? VIDEO VIRAL

नॉर्वेच्या पोरसेंजर शहराचे मेयर Jo Inge Hesjevik भारतात आले असून ते चक्क स्वतः रिक्षा चालवत प्रवास करत आहेत. 61 परदेशी पर्यटकांच्या ग्रुपसोबत 37 रिक्षांचा ताफा भारतभ्रमंती करत आहे. त्यांचा टपरीवर चहा पितानाचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे.

Norway Mayor : भारतात आला नॉर्वेचा मेयर; महागडी कार सोडून रिक्षा चालवतोय, टपरीवर चहा पिताेय चहा, कारण काय? VIDEO VIRAL
norway mayour drives auto Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 7:26 PM
Share

आपल्याकडं रिक्षा म्हणजे काय मोठी गोष्ट नाय राव. हात केला की थांबते, भांड ठरलं की बसायचं आणि निघायचं. पण नार्वेमधून एक साहेब भारतात आले आणि त्यांना फिरायला गाडी म्हणून काय आवडलं तर चक्क रिक्क्षा! आता एवढंच नाही… हे साहेब काही साधे पर्यटक नाहीत. चक्क नॉर्वेच्या पोरसेंजर शहराचे मेयर आहेत आणि आता भारतात स्वत: रिक्क्षा चालवत फिरत आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मेयर माणूस आहे म्हटल्यावर एखादी भारी मोठी गाडी घ्यायला हवी होती. रिक्क्षात काय ठेवलंय. पण थांबा इथं मामला वेगळाच आहे. नॉर्वेतून आलेल्या 61 परदेशी पर्यटकांचा ग्रुप भारत फिरतोय आणि त्याच्यांसोबत 37 रिक्क्षाही आहेत. म्हणजे काय तर सगळ्यांनी रिक्क्षातून भारत बघायचा असं ठरवलंय.

या ग्रुपमध्ये पोरसेंजरचे मेयर Jo Inge Hesjevik ही आहेत. गुजरातमधल्या लिमडी भागात एका स्थानिक युट्यूबरला हा ग्रुप दिसला आणि परदेशी पाहुणे रिक्क्षातून फिरत आहेत हे पाहून व्हिडिओ शूट करायला सुरूवात केली. तेव्हा त्याला कळलं की रिक्क्षा चालवणारा हा परदेशी माणूस कुणी साधासुधा पर्यटक नाही, तर नॉर्वेचा मेयर आहे. व्हिडिओमध्ये मेयर साहेब अगदी टपरीवर चहा पिताना दिसत आहेत.

या सगळ्या प्रवासाचे फोटो व्हिडिओ त्यांचे साथीदार Oyyvind hesjevik सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या पोस्टनुसार हा प्रवासा राजस्थानच्या वाळवंटापासून सुरू झाला. पुढे गुजरात, जैसलमेर आणि आता आणखी पुढे हा ताफा फिरणार आहे. त्यांनी रिक्क्षामधून आतापर्यंत तब्बल 14,000 किमीचा प्रवास केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भारतीयांचे लक्ष वेधून घेत आहे. नॉर्वेचा मेयर भारतात येतो, रिक्क्षा चालवतो, टपरीवर चहा पितो, हे दृश्यच लोकांना भारी वाटतं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...