AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसांनाच नव्हे तर डॉल्फीनलाही गॉसिप करायला येते मजा, संशोधनात झाले उघड

गॉसिप करण्याशिवाय माणसाच्या जीवनात रंगतच नाही असे म्हटले जाते. माणसाशिवाय आता डॉल्फीन माशांनाही गॉसिप करायला फारच मज्जा वाटते असे संशोधनात उघड झाले आहे.

माणसांनाच नव्हे तर डॉल्फीनलाही गॉसिप करायला येते मजा, संशोधनात झाले उघड
dolfinImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 02, 2023 | 8:05 PM
Share

नवी दिल्ली :  मानवी मेंदूच्या गुंतागूंतीची रचना असल्याने मनुष्यप्राणी हा इतर प्राण्याहून वेगळा आहे. परंतू या वेगळ्या रचनेमुळे मानव अनावश्यक गॉसिप करण्यात जास्त वेळ दवडत असतो. म्हणजे मनुष्याला गॉसिप करायाला खूपच आवडते. तसेच गॉसिप करण्यात महिलांना जास्त रस असतो असे म्हटले जात असले तरी संशोधनामात्र महिलांपेक्षा पुरुषच अधिक गॉसिप करत असल्याचे उघडकीस आले आहे. माणसांपेक्षा इतर प्राण्यांमध्ये ज्यांना गॉसिप आवडते त्यात डॉल्फीन मासे आघाडीवर असल्याचे उघडकीस आले आहे. गॉसिपवर संशोधन करताना अनेक मजेशीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

संशोधकांनी मानवाच्या गॉसिप करण्याच्या सवयीचा चांगला अभ्यास केला. गॉसिपमुळे तोटाच होतो असे आपण म्हणत असतो. परंतू संशोधनात मात्र वेगळाच मुद्दा उघडकीस आला आहे. गॉसिपमुळे मनुष्यप्राणी एकमेकांशी जोडला जातो. दोन गॉसिप करणारे एकमेकांचे चांगले मित्र देखील होतात. त्यामुळे गॉसिपची तुलना रसदार फळांशी किंवा चटपटीत चवीच्या वस्तूंशी केली जाते. कारण या गॉसिपमुळे जीवनात एक प्रकारची रंगतच येत असते. माणसाशिवाय पृथ्वीवरील काही सजीव जातींना गॉसिप करायला मजा वाटते. त्यात डॉल्फीन माशांचा नंबर पहिला आहे.

काय म्हणते संशोधन

नेचर इकॉलॉजी एण्ड इवॉल्यूशन नावाच्या जर्नलमध्ये गॉसिपबद्दल एक अभ्यास अहवाल आला आहे. स्टेनफोर्ड आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने समुद्राच्या आत संशोधन केले आहे. त्यात असे आढळले की डॉल्फीन मासे एकमेकांचे नामकरण देखील करतात अशी आश्चर्यकारक माहिती उघडकीस आली आहे. आणि संधी मिळताच गैरहजर असलेल्या आपल्या सहकाऱ्याबद्दल गॉसिपही करतात असे उघडकीस आले आहे. डॉल्फीन माशांच्या गॉसिप पॅर्टन समजण्यासाठी एका खास प्रकारच्या मायक्रोफोनचा वापर करण्यात आला.

आपआपसांत नरमाईने बोलतात

एक डॉल्फीन जे बोलते ते वाक्य सुमारे पाच शब्दांचे असते. त्यानंतर एक छोटासा पॉझ असतो, त्यानंतर दुसरी डॉल्फीन त्या वाक्याला प्रतिसाद देत बोलते. कोणतीही डॉल्फीन दुसऱ्याचे वाक्य संपण्याआधी काही बोलत नाही. म्हणजे एकमेकांचा आदर करीत त्यांचे एकमेकांशी संभाषण सुरू असते. जसे दोन सज्जण एकमेकांशी पोलायट्ली बोलतात, तशाच त्या सॉफ्ट गॉसिप करतात. शास्रज्ञांना त्यांची भाषा जरी समजली नसली तरी हे संभाषण इतर प्राण्यांच्या संभाषणापेक्षा निश्चितच वेगळे होते. इतर प्राणी केवळ संकटकाळात एकमेकांना सावधान करण्यासाठीच चित्रविचित्र आवाज काढतात.

महिलांपेक्षा 20 मिनिटे जास्त पुरूष गॉसिप करतात

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने साल 2019 मध्ये केलेल्या संशोधनात 18 ते 58 वयोगटातील तीनशे पुरूष आणि महिलांवर संशोधन केले. त्यांच्या टेलिफोनिक गप्पांना ऐकल्यानंतर पुरूष दिवसातील 76  मिनिटे गॉसिपमध्ये घालवतात तर महिला 50 ते 55 मिनिटे त्यासाठी वापरतात.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.