Video | Narendra Modi | नवीन वर्षांत मोदींचाही जीमचा संकल्प? एक्सरसाईज करताना कॅमेऱ्यात कैद

Video | Narendra Modi | नवीन वर्षांत मोदींचाही जीमचा संकल्प? एक्सरसाईज करताना कॅमेऱ्यात कैद
जीममध्ये व्यायाम करताना नरेंद्र मोदी

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जीममध्ये जाऊन मोदींनी संपूर्ण जीमचा आढावा घेतला. तिथं काही ट्रेनरही होते. त्यांच्याशी त्यांनी गप्पाही मारल्या. यानंतर मोदींना व्यायाम करण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 02, 2022 | 2:51 PM

नवीन वर्षात जीम वाल्यांची (व्यायामशाळा चालवणाऱ्यांची) चांदीच चांदी होते, असं म्हणतात. कारण प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला व्यायामशाळेत जायचं, फिट व्हायचं, असे संकल्प (New year resolution) करणारे काही कमी नाहीत. सुरुवातीचे काही दिवस जीममध्ये जाऊन घाम गाळायचा आणि नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं तुम्हाला माहीत असेलच. आता एक नवा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा. मोदींनीही नवीन वर्षी जीममध्ये एक्सरसाईज (Exercise) केली आहे. संबित पात्रा यांनी नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियात (Social Media) नव्या चर्चेला उधाण आलंय. नवीन वर्षात मोदींनीही जीमचा संकल्प केला की का?, असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण खरंच तसं आहे का?

का गेले मोदी जीममध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जीममध्ये गेले आणि जिथं जाऊन त्यांनी एक्सरसाईज केली, त्यामागं एक खास कारण दडलंय. मोदींचा एक्सरसाईज करतानाचा हा व्हिडीओ आहे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या प्रकल्पांची पायाभरणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचं चांगलीच कंबरही कसली आहे. मोदींचा उत्तर प्रदेश दौराही त्याचा एक भाग असल्याचं बोललं जातंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली. त्याआधी मोदी या विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले.

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जीममध्ये जाऊन मोदींनी संपूर्ण जीमचा आढावा घेतला. तिथं काही ट्रेनरही होते. त्यांच्याशी त्यांनी गप्पाही मारल्या. यानंतर मोदींना व्यायाम करण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय? मोदींनी बॉडी वेट लॅटपुल मशीनवर बसत थेट एक सेट मारला!

काय असते बॉडी वेट लॅटपुल मशीन?

बॉडी वेट लॅटपुल मशीनवर व्यायाम करुन शरीराच्या स्नायूंना मजबुती मिळते. खासकरुन खांद्यांना बळकटी मिळावी, म्हणून या मशीनवर व्यायाम केला हातो. व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्यांना या मशीनबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. व्यायामशाळेत गेल्या गेल्या या मशिनवर बसून लगेच व्यायाम करत नसतं. त्याआधी वेगवेगळ्या प्रकाराचे व्यायाम आधी करावे लागतात. शिवाय वॉर्मही करावा लागतोच. पण मोदींनी थेट या मशिनवर बसून एक्सरसाईज केली. सलग 15 वेळा मोदींनी हे मशिन ओढलं. याला जीमच्या भाषेत 15 चा एक सेट मारला असंही म्हणतात.

फिटनेसचा आग्रह

दरम्यान, मोदींनी अनेकदा आपल्या संबोधनात फिटनेसचा आग्रह केलेला आहे. 29 ऑगस्ट 2019 रोजी मोदींनी फिट इंडिया मिशनचीही सुरुवात केली होती. आता स्वतः नव्या वर्षात एक्सरसाईज करताना मोदींचा व्हिडीओ समोर आल्यानं त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

VIDEO : सैनिकांच्या कार्यक्रमात जलवा तेरा जलवा…गाण्यावर तरुणीचा खास डान्स, पाहा व्हिडीओ!

VIDEO : इवल्याशा चिमुकलीने केले शास्त्रीय नृत्य, लोक म्हणाले हे तर देवाचेच गिफ्ट…पाहा खास व्हिडीओ!

Video : या माकडाला सुसाट धावताना बघून नेटकरी बोलले हा तर ऑलिम्पिक जिंकेल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें