AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himanshu Jangra : हिमांशू जांग्राची हालत खराब, प्रणित मोरेच्या शो नंतर आयुष्याची कशी वाट लागलीय, त्या बद्दल खुलासा VIDEO

Himanshu Jangra : 370 रुपये बिर्याणीचा किस्सा सांगताना एका मुलीची प्रतिमा मलिन करणाऱ्या हिमांशू जांग्राला आता चांगलीच किंमत चुकवावी लागतेय. तो ज्या कंपनीत कामाला होता, त्याच्या फाऊंडरसोबत बोलताना दिवस कसे बदलून गेलेत, त्या बद्दल खुलासा केलाय.

Himanshu Jangra : हिमांशू जांग्राची हालत खराब, प्रणित मोरेच्या शो नंतर आयुष्याची कशी वाट लागलीय, त्या बद्दल खुलासा VIDEO
Himanshu Jangra-Pranit MoreImage Credit source: x
| Updated on: Jun 13, 2026 | 6:26 PM
Share

स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे चा शो खालच्या पातळीच्या विनोदांमुळे वादात सापडला आहे. सोशल मीडियावर प्रणित मोरे आणि त्याच्या शो मध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. 370 रुपये बिर्याणीचा किस्सा व्हायरल झाला आहे. प्रणितच्या शो मध्ये आलेला 23 वर्षांचा मुलगा हिमांशू जांग्राने हा बिर्याणीचा किस्सा सांगितला. हिमांशू हा किस्सा सांगताना एका मुलीची प्रतिमा मलिन करत होता. शो चा होस्ट प्रणित आणि अन्य प्रेक्षक हसून, हसून अजून त्याला पुढे सांगण्यासाठी प्रोत्साहन देत होते. मी डेटवर गेलेलो. तिथे मी एका मुलीच्या बिर्याणी प्लेटचं 370 रुपये बिल भरलं. बिल भरलं, तर रिर्टनमध्ये काहीतरी वसूल करणार असं हिमांशुच म्हणणं होतं. हे सांगताना हिमांशूचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून आला. म्हणून त्याला ट्रोल केलं जातय.

हिमांशू जांग्राने आपल्या या कृतीबद्दल माफी मागितली व सोशल मिडिया अकाऊंट्स डिलिट केले. प्रणितने सुद्धा माफी मागितली. प्रणितचं म्हणणं आहे की, ‘ती कमेंट प्रेक्षकाने केली होती. तो माझा विचार नाही’ पण प्रणित त्याला प्रोत्साहन देत होता, हे तर सर्वांनी पाहिलं. प्रणित मोरेच्या शो मध्ये हिमांशू जे आक्षेपार्ह बोलला, त्यामुळे त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. गुरगाव येथील कंपनीत तो वेब डेवलपर म्हणून काम करायचा. स्टारविक डिझाइन या कंपनीत हिमांशू नोकरीला होता. शनिवारी स्टारविक डिझाइनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला. स्टारविक डिझाइनचे संस्थापक विवेक विश्वाकर्मा हे हिमांशू सोबत बोलताना दिसत आहेत.

एक आठवडा तर घरात कोणाला काही माहित नव्हतं

व्हिडिओमध्ये विवेक हिमांशूला विचारतात, घरी कसं आहे? त्यावर हिमांशू बोलला की, “सर माझी कंडीशन खूप खराब आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून इन्स्टाग्रामवर खूप ट्रोल होतोय मी. एक आठवडा तर घरात कोणाला काही माहित नव्हतं. माझ्या शहरात कोणाला काही माहित नव्हतं” “आठवड्याभरापूर्वी माझ्या काकांना या वादाबद्दल समजलं. त्यांनी मला विचारलं. तो काकांना बोलला की, तुम्ही कोणाला काही बोलू नका. काही दिवसांनी सर्व विसरुन जातील. पण ट्रोलिंग थांबलं नाही. ते आमच्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचलं. लोकांनी घरी येऊन माझ्या पालकांना सांगितलं की, तुमचा मुलगा चुकीचं बोलला आहे” असं हिमांशू जांग्रा म्हणाला.

का गेले होतो त्या शो मध्ये?

“कुटुंबियांनी मला बोलवून घेतलं व विचारलं हे काय चाललय. मी सांगितलं की माझी चूक झालीय. त्यावर ते ओरडले, समजावलं. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण जेव्हा त्यांना समजलं की, मला नोकरीवरुन काढून टाकलय तेव्हा ते टेन्शनमध्ये आले. आता कुटुंबियांना बघतो तेव्हा मनात खूप पश्चातापाची भावना येते, का गेले होतो त्या शो मध्ये?” असं हिमांशू जांग्राने सांगितलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा