AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतला भन्नाट उखाणा, श्रोत्यांकडून मिळाली दाद

Ajit Pawar and sunetra pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीबरोबर रोखठोक बोलण्यामुळे चर्चा होते. अधिकारी त्यांच्या बैठकीला जाताना पूर्ण तयारी करतात. परंतु आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार चर्चेत आल्या आहेत.

Video : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतला भन्नाट उखाणा, श्रोत्यांकडून मिळाली दाद
sumitra pawarImage Credit source: tv9 Marathi
Updated on: Sep 12, 2023 | 1:27 PM
Share

अभिजित पोते, पुणे | 12 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चर्चा नेहमी माध्यमांमध्ये सुरु असते. परंतु पडद्यामागे राहून गृहविभागाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांची चर्चा माध्यमांमध्ये नसते. सकाळी लवकर उठून घराबाहेर पडणाऱ्या अजित पवार यांचा संसार सुनेत्रा पवार यशस्वीपणे सांभाळत आहेत. पत्नीला नेहमी पतीचा वेळ हवा असतो, परंतु अजित पवार वेळ देऊ शकत नसतानाही कोणतीही कुरबुर त्या करत नाहीत. अजित पवार यांच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे त्या उभ्या राहिला आणि संकटातही साथ दिली. आता सुनेत्रा  पवार चर्चेत आल्या आहे त्या एका उखाण्यामुळे.

कोणत्या कार्यक्रमात म्हटला उखाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भन्नाट उखाणा म्हटला आहे. पुणे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात होत आहे. पुण्यातील मंगळागौर कार्यक्रमात पती अजित पवार यांची आठवण करत सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात हा कार्यक्रम भरवला होता. याच कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला.

कोणता होता उखाणा

मंगळागौर कार्यक्रमात विवाहित महिला आपल्या पतीसाठी उखाणा घेतात. मग जेव्हा सुनेत्रा पवार यांचा नंबर आला त्यावेळी त्यांनी भन्नाट उखाणा घेतला. या उखाण्यास उपस्थित महिला श्रोत्यांनी चांगलीच दाद दिला. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गणपतीला वाहते दुर्वा

पांडुरंगाला वाहते तुळशी

अजितरावांचे नाव घेते

राष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी

यावेळी हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले अन् श्रोत्यांचा टाळ्यांचा कडकडाट झाला.

बोलणं टाळलं, खुर्चीही टाळली; ठाकरे-शिंदेंमध्ये फूल टशन! पाहा VIDEO
बोलणं टाळलं, खुर्चीही टाळली; ठाकरे-शिंदेंमध्ये फूल टशन! पाहा VIDEO.
आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा
आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा.
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.