AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro Video : पुणे मेट्रोतून सायकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल, कॉमेंटचा पाऊस

Pune Metro : पुणे मेट्रो सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पुणे मेट्रोतून अनेक पुणेकरांनी प्रवास केला आहे. मेट्रोला प्रतिसाद वाढत आहे. परंतु पुणे मेट्रोतील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Pune Metro Video : पुणे मेट्रोतून सायकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल, कॉमेंटचा पाऊस
Pune Metro
| Updated on: Sep 03, 2023 | 11:25 AM
Share

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील दोन नवीन मार्गावर मेट्रो सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या मेट्रोला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्गांना महिन्याभरात पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या महिन्याभरात रोज सरासरी 65 हजार 822 जणांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. महिन्याभरात पुणे मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रो सायकल प्रवासाचा हा व्हिडिओ आहे.

काय आहे व्हिडिओ

पुणे मेट्रोमधील सायकल प्रवासाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुण मेट्रो स्टेशनवर सायकल घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहे. सर्वात आधी हा तरुण सायकलवर बसून मेट्रो स्थानकावर येताना दिसतो. त्यानंतर मेट्रोच्या लिफ्टमध्ये जातो. मेट्रो स्थानकावर सुरक्षा कर्मचारी त्याची तपासणी करतात. त्यानंतर हा युवक सायकलसह मेट्रो स्थानकात प्रवेश करतो. पुढे मेट्रोमधून सायकल प्रवास सुरु होतो.

काय पडल्या कॉमेंट

सोशल मीडियावर निकेत जगताप नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पुणे तेथे काय उणे, दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, मेट्रोवर आता सायकल ट्रॅक कर, आणखी एका युजरने म्हटले आहे की, मेट्रो अशी परवानगी देत असले तर चांगली सुविधा आहे. सायकलने ऑफिसला जाता येईल. एका युजरने म्हटले आहे की, सायकल घेऊन जायाची असेल तर एक्सट्रा चार्ज द्यावा लागतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.

यापूर्वी हा व्हिडिओ झाला होता व्हायरल

मेट्रोचा यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत हात दाखवल्यावर मेट्रो थांबत असल्याचे दिसत होते. यामुळे हात दाखवा आणि बस थांबवा प्रमाणे मेट्रो थांबवा, असे झाले होते….वाचा सविस्तर

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.