बायकोने कढीत टॉमेटो जास्त टाकले, पती मारतोय पोलिस ठाण्याच्या चकरा

टोमॅटोचे दर आकाशा भिडले आहेत. टोमॅटोच्या दरावरुन सरकारने हस्तक्षेप करीत दर कमी करण्यासाठी पावले उचलावी लागली आहेत. अशा टोमॅटोच्या किंमतीने नात्यांमघ्ये दुरावा येत आहे.

बायकोने कढीत टॉमेटो जास्त टाकले, पती मारतोय पोलिस ठाण्याच्या चकरा
tomatoes price
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 20, 2023 | 2:01 PM

भोपाळ : टोमॅटोच्या महागाईने कळस गाठला आहे. आता सरकारने टोमॅटोच्या किंमतीवर ( Tomatoes Price ) आवाक्यात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. असा गरीबांपासून श्रीमंताना छळणाऱ्या टोमॅटोच्या वरुन आता कौटुंबिक कलह निर्माण होत आहेत. टोमॅटोचे दर वैवाहिक नात्यांमध्येही आता दुरावा निर्माण होऊ लागला आहे. एका कुटुंबात पत्नीने कढीत टोमॅटो ( Tomatoes Curry ) जादा घातल्याने नवरोबा नाराज झाले. आणि पती आणि पत्नीमध्ये शाब्दीक चकामक झडली. त्यामुळे काय नेमके घडले हे पाहा..

टोमॅटोचे दर उत्तरेकडील राज्यात 300 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टोमॅटोच्या दरावरुन सरकारने हस्तक्षेप करीत दर कमी करण्यासाठी पावले उचलावी लागली आहेत. अशा टोमॅटोच्या किंमतीने आता घराघरात वादंग होत आहेत. गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मध्य प्रदेशातील शाहडोल जिल्ह्यात एका जोडप्यामध्ये टोमॅटोच्यावरुन खडाजंगी झाली. त्यामुळे हे भांडण वाढल्याने पोलिसात प्रकरण गेले आहे.

पती मारतोय चकरा

टोमॅटोच्या गगनाला भिडणारे दर पाहता. आता वैवाहिक नात्यांमध्ये टोमॅटोच्या किंमतीने दरी निर्माण झाली आहे. शाहडोल जिल्ह्यातील बेमहोरी गावात पतीच्या परवानगी शिवाय पत्नीने ग्रेव्हीमध्ये टोमॅटोचा वापर केल्याने पतीचे टाळकं सटकले. आणि पतीने पत्नीला इतके बोल लगावले की नवराबायकोत खडाजंगी झाली. पत्नीची नवरोबांवर इतकी खप्पा मर्जी झाली तिने तडक माहेरचा रस्ता धरला. रागाचा पारा खाली आल्यानंतर मात्र नवरोबाने माझ्या बायकोला परत आणा अशी विनवणी करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारीत आहे.