AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचे डबे लाल, निळा, हिरवा याच रंगाचे का असतात?, जाणून घ्या प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्ये, उपयोगी पडेल…

भारतीय रेल्वेचे डबे तीन रंगाचे असतात. काही लाल, काही निळ्या आणि काही हिरव्या रंगाचे डबे आपण पाहिले असतील. त्याचा अर्थ काय आपल्याकडे याच रंगाचे डबे का असतात. याचा शोध घेऊयात...

रेल्वेचे डबे लाल, निळा, हिरवा याच रंगाचे का असतात?, जाणून घ्या प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्ये, उपयोगी पडेल...
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 11:33 AM
Share

मुंबई : रेल्वेचे डबे (Railway Coach) आपल्याला विशिष्ट रंगाचेच दिसतात. असं का असेल असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना (viral news) पडला असेल. त्याचंच उत्तर आज तुम्हाला सांगणार आहोत…भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. भारतात एकूण 12,167 पॅसेंजर ट्रेन्स आणि 7349 मालगाड्या आहेत. भारतीय रेल्वेतून दररोज 23 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. विशेष हा आकडा ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढा आहे! भारतीय रेल्वेचे डबे तीन रंगाचे असतात. काही लाल, काही निळ्या आणि काही हिरव्या रंगाचे डबे आपण पाहिले असतील. त्याचा अर्थ काय आपल्याकडे याच रंगाचे डबे का असतात. याचा उहापोह करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.

लाल रंगाचा रेल्वे डबा

सध्या लाल रंगाच्या डब्यांची संख्या वाढली आहे. लाल रंगाच्या रेल्वे डब्यांना LHB म्हणजेच Linke Hofmann Busch म्हणतात. हे रेल्वे डबे पंजाबमधील कपूरथला इथे तयार केले जातात. हे डबा तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो. यामुळे हे डबे वजनाने हलके असतात. हे डबे डिस्क ब्रेकसह 200 किमी/ताशी वेगाने चालवता येतात. त्याच्या देखभालीवरही कमी खर्च येतो. अपघात झाल्यास हे डबे एकमेकांच्या वर चढत नाहीत. कारण त्यांच्याकडे सेंटर बफर कुलिंग सिस्टम आहे.

हिरव्या रंगाचे रेल्वेचे डबे

गरीब रथ एक्सप्रेस गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. तर मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात. नॅरोगेज गाड्यांमध्ये हलक्या रंगाचे डबे वापरले जातात.आता देशातील नॅरोगेज गाड्यां सध्या जवळपास बंद झाल्या आहेत.

निळ्या रंगाचे रेल्वेचे डबे

निळ्या रंगाच्या डब्यांना इंटिग्रल कोच फॅक्टरी कोच म्हणतात. निळ्या डब्यांसह ट्रेनचा वेग 70 ते 140 किमी/ताशी असतो. मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे वापरले जातात. इंटिग्रल कोच फॅक्टरी तामिळनाडू इथे आहे. ते तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. हे डबे जड असतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असतो. या डब्यांना दर 18 महिन्यांनी ओव्हरहॉल करणं आवश्यक असतं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.