Video | ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्द विसरले, अन् मुख्यमंत्री देशभरात ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

लोकांशी संवाद साधताना अशोक गेहलोत चक्क लॉकडाऊन हा शब्दच विसरले आहेत. (ashok gehlot forgot lockdown name video)

Video | ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्द विसरले, अन् मुख्यमंत्री देशभरात ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
asok-gehlot
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 4:12 PM

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांकडून वेगवेगळे नियम लागू केले जात आहेत. महाराष्ट्र, दिल्ली सारख्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अनेक निर्बंध आहेत. राजस्थानमध्येसुद्धा कोरोनामुळे लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) हे जनतेशी वेळोवेळी संवाद साधत आहेत. मात्र, यावेळी संवाद करताना गेहलोत हे चांगलेच अडचणीत सापडलेयत. ऑनलाईन संवाद साधताना ते चक्क लॉकडाऊन हा शब्दच विसरलेयत. लॉकडाऊन शब्द आठवत नसल्यामुळे त्यांनी शेवटी चक्क डोक्याला हात लावला. त्यांचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Rajasthan CM Ashok Gehlot forgot name of Lockdown video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ते या व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या मजूर संघटन इंटकच्या स्थापना दिवसानिमित्त ऑनलाईन संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या कोरोनस्थितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना राजस्थानमध्ये सध्या 3 मे ते 17 मे पर्यंत ‘जनअनुशासन पखवाड़ा’ सुरु आहे. त्याअंतर्गंत येथे लॉकडाऊनसारखेच नियम लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असल्याप्रमाणेच हे नियम पाळावेत असे यावेळी गेहलोत सांगत होते. मात्र, यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांना लॉकडाऊन हा शब्दच आठवत नव्हता. शब्दच आठवत नसल्यामुळे पुढे काय बोलावं हे त्यांनी समजतच नव्हते. याच कारणामुळे गेहलोत यांची चांगलीच फजिती झाली. शेवटी प्रयत्न करुनसुद्धा शब्द न आठवल्यामुळे त्यांनी डोक्याला हात लावला.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियाव चर्चा

गेहलोत यांना लॉकडाऊन शब्द आठवत नसल्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. शेवटी एका चिठ्ठीवर लिहून दिल्यानंतर गेहलोत यांनी लॉकडऊन शब्द स्पष्टपणे उच्चारला. या सगळ्या धांदलीमुळे गेहलोत यांना सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं जात आहे.

इतर बातम्या :

Video: स्कूटीवाल्या महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, मास्क घातलाय हेल्मेट घालणार नाही, पोलिसांवरच भडकली

ना डोक्याखाली उशी, ना अंगावर चादर, तरीही शांतपणे झोप; कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या आमदाराचा ‘हा’ फोटो पाहाच

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

(Rajasthan CM Ashok Gehlot forgot name of Lockdown video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.