AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: लहान लेकरांचे भारी जुगाड, सचिन तेंडुलकरही प्रेमात पडला; थेट व्हिडीओ केला शेअर; पाहा त्यात आहे तरी काय?

Viral Video: सध्या सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलांनी केलेला जुगाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता हा जुगाड कोणता आहे तु्म्ही देखील एकदा पाहा.

Video: लहान लेकरांचे भारी जुगाड, सचिन तेंडुलकरही प्रेमात पडला; थेट व्हिडीओ केला शेअर; पाहा त्यात आहे तरी काय?
Sachin tendulkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 12, 2026 | 5:04 PM
Share

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर सतत काही ना काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अलीकडेच त्याने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गावातील मुलांनी बनवलेल्या एका ‘जुगाडू’ कारने प्रभावित झालेला दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने एक खास संदेशही लिहिला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेमका काय आहे व्हिडीओ?

सचिनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गावातील काही मुले जुगाड करून बनवलेली एक छोटी कार चालवताना दिसत आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, ही गाडी लाकूड, लोखंडी सळ्या आणि चाकांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. एक मुलगा या जुगाडू कारवर बसला आहे आणि दुसरा मुलगा धावत तिला पुढे ढकलत आहे. दिसायला ही कार अत्यंत साधी आहे, परंतु तिची रचना आणि मुलांच्या कल्पकतेने सचिनचे मन जिंकले आहे. व्हिडीओमध्ये सचिन मुलांशी संवाद साधताना आणि त्यांचे कौतुक करताना दिसत आहे.

सचिनने शेअर केला व्हिडीओ

सचिन तेंडुलकरने मुलांचा हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “भारताच्या अनेक दुर्गम कोपऱ्यांपैकी एका भागातून जात असताना, आम्ही एक अशी ‘कार’ पाहण्यासाठी थांबलो जी कोणत्याही0 शोरूममधून आली नव्हती, तर ती केवळ कल्पकतेचा नमुना होती. ही अशा प्रकारची प्रतिभा आहे जी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत नाही, तर कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याचा मार्ग शोधून काढते. फक्त संधी मिळायला हवी” असे म्हटले आहे.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सचिनच्या या पोस्टने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हिडीओच्या कमेंट्समध्ये लोक मुलांचे तोंडभरून कौतुक करत आहेत. काही युजर्सनी या मुलांना ‘भविष्यातील इंजिनिअर’ म्हटले आहे, तर काहींनी या कल्पकतेला ‘शानदार जुगाड’ म्हटले आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ