यूट्यूबवर व्हिडीओ टाकला, नंतर वडिलांसमोर स्वत:ला संपवले.. डोळ्यात पाणी आणणारी सजल जोशीची कहाणी
सलग जोशी नावाच्या एका 24 वर्षीय तरुणाने यूट्यूबवर 6 मिनिटे 32 सेकांदाचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर त्याने वडिलांसमोरच त्याने स्वत:ला संपावले आहे. आचा नेमकं असं काय घडलं चला जाणून घेऊया...

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 24 वर्षीय तरुणाने वडिलांसमोर गळ्यावर चाकू फिरवत स्वत:ला संपवले आहे. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचे नाव सजल जोशी असे होते. मृत्यू पूर्वी सजलने यूट्यूबवर 6 मिनिटे 32 सेकांदाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने स्वत:ला संपवण्याचे कारण सांगितले होते. चला जाणून घेऊया नेमंक प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, सजल जोशी हा कुटुंबीयांसोबत कर्नाटकात राहात होता. त्याने यूट्यूबवर एक व्हिडीओ टाकला होता. हा व्हिडीओ त्याच्या भावाने पाहिला होता. भावाने तातडीने वडिलांना फोन केला. त्याने सजलने व्हिडीओमध्ये जे काही सांगितले ते सर्व सांगितलं. वडील पळत सजलच्या खोलीमध्ये पोहोचले तेव्हा सजलच्या हातामध्ये चाकू होता. त्यांनी त्याच्या हातातून चाकू खेचण्याचा प्रयत्न केला. पण सजलने तोपर्यंत चाकू स्वत:च्या गळ्याभोवती फिरवून आत्महत्या केली. त्याच्या गळ्यातून रक्तास्त्राव होत होता.
वडिलांनी तातडीने सजलला हॉस्पिटलमध्ये नेले. पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ते ऐकून वडील सदम्यात गेले. सजलने यूट्यूबवर जो व्हिडीओ शेअर केला होता त्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, ‘मम्मी-पप्पा आय एम रियली सॉरी.. तुम्हाला वाईट वाटेल, खूप धक्का बसेल पण आता मी हारलो आहे. मी हा व्हिडीओ याकरता शूट करत आहे की नंतर कोणी उगाच काहीही अफवा पसरवू नये. माझ्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही. मी आजारपणाचा सामना करून थकलो आहे.’ व्हिडीओमध्ये सजलने सांगितले की तो हाडांशी संबंधीत एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. उपचार घेतल्यानंतरही तो बरा झाला नाही. त्यामुळे त्याला आयुष्याचा कंटाळा आला होता.
दोन वर्षांपूर्वी सुरु केले यूट्यूब चॅनेल
सजलने दोन वर्षांपूर्वीच सुरु केले होते यूट्यूब चॅनेल. तो या चॅनेलवर सतत व्हिडीओ पोस्ट करायचा. पण आजारपणामुळे त्याने यूट्यूबपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी त्याने मरणापूर्वी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सजलचा शेवटचा व्हिडीओ ठरला आहे.
