AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NASA Peanuts Tradition:नासा मधील शास्त्रज्ञ मोहिमेपूर्वी खातात शेंगदाणे; मोहिमेच्या आधीच शेंगदाण्याचे डबे कंट्रोल रूममध्ये पोहोचतात

नासाचे शास्त्रज्ञ चक्क शेंगदाण्याशी संबंधित असलेल्या एका विचित्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात अशी चर्चा आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मोहिमेची तयारी सुरू असताना शास्त्रज्ञ चक्क शेंगदाणे खातात. मात्र, यामागे शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक कारण दिले आहे. शेंगदाणे खाण्याचे फायदे लक्षात घेता शास्त्रज्ञांनी दिलेली वैज्ञानिक कारणं पटण्यासारखी आहेत.

NASA Peanuts Tradition:नासा मधील शास्त्रज्ञ मोहिमेपूर्वी खातात शेंगदाणे; मोहिमेच्या आधीच शेंगदाण्याचे डबे कंट्रोल रूममध्ये पोहोचतात
| Updated on: Jul 10, 2022 | 6:59 PM
Share

वॉशिंग्टन : जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आणि रुढी परंपरा पाळल्या जातात. मात्र, आंधश्रद्धा, काल्पनिक रुढी-परंपरा यांच्या विरोधात विज्ञानाचा आधार घेऊन यशस्वी झेप घेणारी अमेरिकची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा (NASA) मधील शास्त्रज्ञांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणत्याही मोहिमेपूर्वी NASA मधील शास्त्रज्ञ शेंगदाणे खातात अशी विचित्र माहिती समोर आली आहे. कोणत्याही महत्वाच्या मोहिमेच्या आधी शेंगदाण्याचे डबे कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले असतात. NASA मध्ये ही प्रथाच बनली आहे. यामागे एकचे कारण देखील इंटरेस्टींग असेच आहे.

नासाचे शास्त्रज्ञ चक्क शेंगदाण्याशी संबंधित असलेल्या एका विचित्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात अशी चर्चा आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मोहिमेची तयारी सुरू असताना शास्त्रज्ञ चक्क शेंगदाणे खातात. मात्र, यामागे शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक कारण दिले आहे. शेंगदाणे खाण्याचे फायदे लक्षात घेता शास्त्रज्ञांनी दिलेली वैज्ञानिक कारणं पटण्यासारखी आहेत.

शेंगण्यातील विशिष्ट घटकांमुळे शेंगदाणे खाल्ल्याने तणाव कमी होतो. यामुळे चिंता, काळजी अर्थात स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. 1960 पासून नासातील शास्त्रज्ञ कोणत्याही मोहिमेपूर्वी शेंगदाणे खाण्याची प्रथा पाळत आहेत.

अनेक दशकांपूर्वी जगात खूप अंधश्रद्धा होती. त्या वेळी शास्त्रज्ञांनी नवनवीन शोध लावले आणि अनेक रहस्यांचा उलगडा केला. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरे समजावून सांगितली. शास्त्रज्ञ नेहमीच तर्क आणि विज्ञानाविषयी बोलताना दिसतात. मात्र, नासाच्या शास्त्रज्ञांच्या मोहिमेआधी शेंगदाणे खाण्याच्या प्रथेबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

एका वेबसाइटने याबाबते वृत्त दिले आहे. ‘नासा’चे शास्त्रज्ञ कोणतीही मोहीम सुरू करण्यापूर्वी किंवा अवकाश विज्ञानाशी संबंधित काही प्रकल्प राबवण्यापूर्वी शेंगदाणे खातात. मोहिमेशी संबंधित कठीण काळात शेंगदाणे खाल्ले, तर मोहीम यशस्वी होते आणि सर्व काही सकारात्मक घडते, असे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शास्त्रज्ञ या गोष्टीला एक प्रथा मानतात. तथापि ही दुसरे काही गोष्ट नसून, केवळ एक अंधश्रद्धा असल्याचा दावा संबधीत वेबसाईटने केला आहे.

अशी सुरु झाली शेंगदाणे खाण्याची प्रथा

1960 च्या दशकात ही प्रथा सुरू झाली. रेंजर-7 नावाचे एअरक्राफ्ट लाँच करत असताना उड्डाण करण्यात सहा वेळा अपयश आले. यामुळे संपूर्ण टीम निराश झाली होती. जेव्हा सातव्यांदा एअरक्राफ्ट उड्डाणासाठी तयार झाले, तेव्हादेखील सर्व जण चिंतेत होते. मग सर्वांची काळजी कमी व्हावी, या उद्देशाने एका व्यक्तीनं सर्वांना शेंगदाणे खायला दिले. त्या दिवशी एअरक्राफ्टने यशस्वीरीत्या उड्डाण केलं आणि तेव्हापासून नासाच्या शास्त्रज्ञांनी शेंगदाणे खाण्याची प्रथा सुरु केली. कोणत्याही कठीण मोहिमेची तयारी सुरू असताना नासाच्या शास्त्रज्ञांनी शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली.

नासाच्या सोलर सिस्टीम एक्सप्लोरेशन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी अन्य शास्त्रज्ञांना शेंगदाणे खायला देणाऱ्या व्यक्तीचे नाव डिक वॉलेस होते. मला वाटले होते की शेंगदाणे खाल्ल्याने त्यांची चिंता काही काळ दूर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तेव्हापासून जेव्हा जेव्हा मोहीम असते तेव्हा शेंगदाण्याचे डबे आधीच मोहिमेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचतात. त्यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांची ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.