एका हातात काठी, दुसऱ्या हातात फडकं… महिला अधिकाऱ्याने असा पकडला कोब्रा, थरूर यांच्याकडून कौतुक

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी केरळमधील एका तरुण वन अधिकाऱ्याचे कौतुक केले आहे. या व्हिडीओमध्ये महिला अधिकारी एका विशाल किंग कोब्राला वाचवताना दिसत आहे.

एका हातात काठी, दुसऱ्या हातात फडकं... महिला अधिकाऱ्याने असा पकडला कोब्रा, थरूर यांच्याकडून कौतुक
Shashi Tharoor
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 10, 2025 | 1:30 PM

केरळच्या वन खात्यांतर्गत परुथीपल्ली रेंजमधील जीएस रोशनी यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या केवळ हुक आणि गोण घेऊन विषारी सापाला पकडताना दिसत आहेत. या नाट्यमय व्हिडीओमध्ये त्या सहा मिनिटांत विषारी सापाला सुरक्षितपणे पकडताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शशी थरूर यांनी शेअर केला आहे.

शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडीओ

सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर, शशी थरूर यांनी रोशनी यांच्या कृतीचे कौतुक केले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “वन अधिकारी रोशनी यांचे चकीत करणारे धैर्य आणि क्षमता दिसत आहे! केरळ सरकारला त्यांच्या या सेवेची योग्य दखल घेण्याचे आवाहन करतो.”

Video: निळ्या रंगाचा नाग? शेतकऱ्याने काढी मारली तेवढ्यात… व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

नेमकं काय घडलं?

हा साप तिरुवनंतपुरमजवळील पेप्पारा येथील अंचुमारुथुमूट येथील रहिवासी भागात घुसला होता. तेथे स्थानिकांना तो जवळच्या ओढ्यात आंघोळ करताना पाहिला. तात्काळ रोशनी यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले. त्यानंतर एका हातात काठी घेऊन, दुसऱ्या हातात काळं फडकं घेऊन रोशनी यांनी सापाला पकडले. कोब्रा पकडतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी सरकारी सेवेतील अशा समर्पणाच्या कृतींची दखल घेण्याची गरज असल्याचे सांगितले, “कर्तव्यातील अशा धैर्याला बऱ्याचदा गृहीत धरले जाते आणि त्याचे कौतुक होत नाही.”

मुरली थुम्मारुकुडी, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन (UNCCD) च्या G20 ग्लोबल लँड इनिशिएटिव्हचे संचालक, यांनीही तिच्या प्रयत्नांची दखल घेतली. फेसबुक पोस्टमध्ये, थुम्मारुकुडी यांनी या अधिकाऱ्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. विशेषतः जेव्हा त्यांना कळले की हा तिचा किंग कोब्रा वाचवण्याचा पहिलाच प्रसंग होता.