आज कुछ तुफानी करते है! विमान ऑटो मोडवर टाकून पायलटचा एअर हॉस्टेससोबत रोमान्स, धक्कादायक खुलासे वाचून उडेल झोप
एक एअर होस्टेसने विमान प्रवासातील 'माइल हाय क्लब'बाबत धक्कादायक माहिती उघड केली आहे. तिने पायलट आणि केबिन क्रूच्या गोपनीय संबंधांचा खुलासा केला आहे.

अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वजण हादरले आहेत. विमानातून प्रवास करणं हे वेळेची बचत करणारं असलं तरी अनेकांना आता या प्रवासाची भीती वाटू लागली आहे. पण आता या विमान प्रवासाबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तुम्हाला आणखी मोठा धक्का बसेल. एका एअर हॉस्टेसने पायलट आणि केबिन क्रूच्या काही अशा गोष्टी उघड केल्या आहेत की त्या ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन हादरेल.
विमानात ३० हजार फुटांवर नेमकं काय होतं, याची माहिती अनेकदा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही नसते. नुकतंच एका एअर हॉस्टेसने दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सिएरा मिस्ट असे या एअर हॉस्टेसचे नाव आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने लांबच्या विमान प्रवासादरम्यानच्या अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
माइल हाय क्लब म्हणजे काय?
लांबच्या विमान प्रवासात जेव्हा सगळे प्रवासी आरामात झोपलेले असतात, तेव्हा कॉकपिटमध्ये वेगळं चित्र असतं. पायलट आणि एअर होस्टेस किंवा इतर केबिन क्रू ‘माइल हाय क्लब’मध्ये सामील होतात. ‘माइल हाय क्लब’ म्हणजे जेव्हा विमान हवेत उडत असताना काही फ्लाइट अटेंडंट्स, पायलट किंवा इतर केबिन क्रू एकमेकांसोबत ‘रोमान्स’ करतात. अनेक तास प्रवास केल्यानंतर विमान एका विशिष्ट उंचीवर पोहोचते. तेव्हा काही पायलट थोड्या वेळासाठी विमान ‘ऑटो पायलट’ मोडवर टाकतात. त्यानंतर पायलट आणि फ्लाइट अटेंडंट्सचा ‘रोमान्स’ सुरू होतो, असा दावा सिएरा मिस्ट यांनी केला.
कॉकपिटमध्ये नेहमी दोन पायलट असतात. जेव्हा एका पायलटला आराम करायचा असतो, तेव्हा दुसरा पायलट विमान सांभाळतो. यावेळी जो पायलट आराम करत असतो, त्याचे जर विमानातील एअर होस्टेससोबत अफेअर चालू असेल तर तो सहज रोमान्स करु शकतो. तसेच एकाच विमानात जर एकमेकांना आवडणारे पायलट किंवा एअर होस्टेस एकत्र असतील, तर ते आरामात एकमेकांसोबत रोमान्स करतात आणि संबंधही ठेवतात, असेही मिस्टने म्हटले आहे.
‘ऑटो पायलट’ मोडवर टाकून रोमान्स
जर पायलटला भूक लागली असेल किंवा त्याला वॉशरूमला जायचं असेल, तर त्याला कॉकपिटमधून बाहेर यावं लागतं. त्यावेळी जर एखादी एअर होस्टेस कॉकपिटमध्ये गेली आणि त्यांचं अफेअर असेल तर मग पायलट प्लेन ‘ऑटो पायलट’ मोडवर टाकून रोमान्स करतो. विमानात हे सगळं करणं कायद्याने चुकीचं नसलं तरी, त्याला योग्य म्हणता येणार नाही. मी अनेकदा माझ्या कित्येक सहकाऱ्यांना बाथरूममध्ये किंवा केबिनमध्ये अशा गोष्टी करताना पकडले आहे. ड्युटीवर असताना असं करणं योग्य नाही. विमान उडवत असताना संबंध ठेवण्यासाठी पायलट आणि एअर होस्टेसने कडक नियमांचं पालन करायला हवं. त्यामुळे जेव्हा तुम्ही विमान प्रवास कराल तेव्हा हे सुनिश्चित करा की तुम्ही अशा टीमसोबत आहात, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, असे मिस्ट यांनी म्हटले.
