Video: कित्येक फूट लांब, आणि शेकडो किलोचा अजगर पाठीवर, सर्पमित्राचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल!

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या खांद्यावर एक अत्यंत जड अजगर घेऊन फिरताना दिसत आहे. अजगराची लांबी 15 फुटांपेक्षा जास्त असल्याचे दिसते.

Video: कित्येक फूट लांब, आणि शेकडो किलोचा अजगर पाठीवर, सर्पमित्राचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल!
अजगराला घेऊन जाणारा सर्पमित्र
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 3:50 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ज्या पद्धतीने 15 फुटांपेक्षा मोठा अजगर खांद्यावर घेऊन जात आहे, ते खरोखरच थक्क करणारं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढतील. विशेषत: ते लोक घाबरतील, जे सापाचे नाव ऐकताच थरथर कापायला लागतात. (Snake Video Viral Video Show a man carrying 15 feet long python on his shoulder amazing Video)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या खांद्यावर एक अत्यंत जड अजगर घेऊन फिरताना दिसत आहे. अजगराची लांबी 15 फुटांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये तो माणूस अजगराला घेऊन पायऱ्या चढताना दिसत आहे. यानंतर तो एका खोलीत प्रवेश करतो. हा सीन एखाद्या हॉरर चित्रपटासारखा वाटतो.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ royal_pythons_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला जवळपास 6 हजार लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या कमेंट्स करत आहेत. काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी अजगराशी पंगा न घेण्याचा सल्ला दिला आहे. एका यूजरने मजेशीर कमेंट करताना लिहिले आहे की, ‘आई, बघ मी माझ्यासोबत काय आणले आहे, मी ते आपल्या घरात ठेवू शकतो का?’.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाऊ, त्याला खाली ठेवा. तो किती मोठा आणि धोकादायक दिसत आहे ते आम्ही पाहात आहोत.’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांनी इमोटिकॉनद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पाहा:

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी अवाक!

Video: चटक चांदणी, चतूर कामिनी, काय म्हणायचं हीला, ही आहे तरी कोण, बाई की लाईटचं दुकान? दिवाळीत लाईटची साडी व्हायरल