VIDEO | चालत्या मालगाडीच्या छतावर उभा राहून केला स्टंट, सलमान खानच्या स्टाईलमध्ये बनवला व्हिडिओ
Stunt Viral Video | व्हिडीओमध्ये दोन तरुण दिसत आहेत. त्या दोघांनी चालत्या मालगाडीच्या छतावरती स्टंट केला आहे. विशेष म्हणजे हा स्टंट करीत असताना त्यांचं ट्रेनच्या विद्युत तारेकडं अजिबात लक्ष नाही.

मुंबईत : सध्याच्या जमान्यात आपला व्हिडीओ व्हायरल (Greater Noida Viral Video) होण्यासाठी लोकं काहीही करतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Stunt Viral Video) होत असतात. ज्यावेळी लोकं व्हिडीओ तयार करीत असतात, त्यावेळी आपल्या जीवाची सुध्दा परवा करीत नाहीत असं अनेकदा दिसून आलं आहे. काहीवेळेला चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ करणाऱ्या तरुणांवरती कारवाई सु्ध्दा करण्यात आली आहे. परंतु अशा पद्धतीचे स्टंट नेहमी व्हायरल (Viral Video) होतात. त्यावरती नेटकरी सुध्दा नेहमी मजेशीर कमेंट करीत असतात.
बाईकचे स्टंट आपल्याला अनेकदा प्रवास करीत असताना सुध्दा पाहायला मिळतात. परंतु, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा घाबरुन जालं. चालत्या मालगाडीच्या छतावरती दोन तरुण उभे राहून स्टंट करीत आहेत.
मालगाडीच्या छतावरती दोन तरुण विना शर्ट उभे आहेत
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो ग्रेटर नोएडामधील असल्याचं सांगितलं जात आहे. दोन तरुण चालत्या गाडीवरती फिल्मी स्टाईलमध्ये स्टंट करीत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हे सुध्दा पाहायला मिळत आहे की, मालगाडीच्या छतावरती दोन तरुण विना शर्ट उभे आहेत.
दोघांनी आपले पाय दोन्ही वेगवेगळ्या डब्ब्यांवर ठेवले
व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती डब्बे जिथं जोडले जातात, तिथं उभे आहेत. दोघांनी आपले पाय दोन्ही वेगवेगळ्या डब्ब्यांवर ठेवले आहेत. हा व्हिडीओ ज्यावेळी तिथून एक मालगाडी जात होती, त्यावेळचा आहे. दोन्ही तरुणांना आपल्या जीवाची अजिबात काळजी नाही.
Stupid way to enjoy with peer group.#GreaterNoida #Railwaysafety pic.twitter.com/mlKjRfzHSb
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) June 22, 2023
मसल्स दाखवून बनवले रिल्स
ट्रेनच्यावरती विद्युत तार असती, त्या तारेला तुमचा स्पर्श जरी झाला, तरी तुमचा मृत्यू होऊ शकतो. हे सगळ माहित असून छतावर असलेले तरुण मसल्स दाखवत आहेत. सध्या काही तरुण-तरुणी रील्स तयार करीत असताना, सामान्य लोकांना किती त्रास होत हे सांगायला नको. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
