दरवर्षी कुंवाऱ्या मुलीशी लग्न… राजा आहे की… कोणत्या देशात ही परंपरा?
स्वाझीलँडमधील उमलांगा सेरेमनी हा एक वादग्रस्त उत्सव आहे. ज्यामध्ये तरुणी राजासमोर नग्न नृत्य करतात. हा उत्सव राजेशाही सत्तेचे प्रतीक असून, देशातील गरिबी आणि राजाच्या विलासी जीवनातील तफावतही दाखवतो.

अनेक देशांनी काळानुसार हुकूमशाही आणि राजेशाही सोडून लोकशाहीचा अंगिकार केला आहे. देशाच्या सत्तेत जनतेचा सहभाग करून देशाची प्रगती साधण्यावर अनेक देशांचा भर आहे. पण जगातील असे असंख्य देश आहेत की जिथे अजूनही राजेशाही आहे. राजा जे सांगेल तेच प्रजेला ऐकावे लागते. राजेशाही असलेला एक देश म्हणजे स्वाझीलंड. या देशाचे राजा सर्व निर्णय आपल्या इच्छेनुसार घेतो आणि त्याच्यावर कोणतेही बंधन नाही. स्वाझीलंड हा आफ्रिकेच्या महाद्वीपात दक्षिण आफ्रिकेला लागून आहे. 2018 मध्ये या देशाच्या स्वतंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा या देशाच्या राजाने देशाचे नाव बदलून ‘द किंगडम ऑफ इस्वातिनी’ ठेवले.
स्वाझीलंडची एक विलक्षण आणि चक्रावणारी परंपरा आहे. स्वाझीलंडचा राजा दरवर्षी के नवी बायको करतो. ती इथली पंरपराच आहे. या परंपरेमुळेच हा देश अधिक चर्चेत आला आहे. स्वाझीलंडचा राजा दरवर्षी एक नवरी निवडतो. लग्न करतो.
तरुणींचं नग्न नृत्यू
स्वाझीलंड दक्षिण आफ्रिकेच्या जवळ आहे. या ठिकाणी एक विशेष प्रकारचा उत्सव ‘उम्हलांगा सेरेमनी’ दरवर्षी साजरा होतो. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हा उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात 10,000 पेक्षा जास्त अविवाहित तरुणी आणि लहान मुली सहभागी होतात. या समारंभात त्या मुली राजा समोर नृत्य करतात. स्वाझीलंडच्या या परंपरेला खूपच अजब मानले जाते, कारण या कार्यक्रमात मुली राजा आणि त्याच्या प्रजेच्या समोर नग्न होऊन नृत्य करतात.
तरुणीच्या कुटुंबीयांना दंड
2020 मध्ये अनेक तरुणींनी या परेडला विरोध केला होता. तसेच या उत्सवात सहभागी होण्यास नकार दिला होता. परंतु, हा विरोध राजा आणि सरकारच्या नजरेत आला. आणि त्या मुलींच्या कुटुंबांना मोठा दंड भरावा लागला होता. स्वाझीलंडमधील राजा नेहमीच विलासी जीवन जगतो, तर त्याच्या देशातील बहुतांश लोक अत्यंत गरीब आहेत.
देश गरीब, राजा श्रीमंत
स्वाझीलंडच्या लोकांची गरीबी इतकी गंभीर आहे की त्यांना पुरेसं अन्न मिळवण्यासाठी आणि कपडे विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. पण राजाच्या संपत्तीचा अंदाज आपण यावरून लावू शकता की त्याच्याकडे अरबो रुपयांची संपत्ती आहे, आणि ती संपत्ती सतत वाढत आहे.
