AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: लग्नात नाचता नाचता नवरी नवऱ्याच्या पाठीवर, नवरा कोसळला आणि व्हिडीओ व्हायरल झाला

म्हणतात ना उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, पण या व्हिडीओत नवरीच जास्त उतावीळ असल्याचं दिसतं आहे. असंच काहीसं ही नवरी करते. आणि पाहुणे मंडळी पोट धरुन हसू लागतात.

Viral Video: लग्नात नाचता नाचता नवरी नवऱ्याच्या पाठीवर, नवरा कोसळला आणि व्हिडीओ व्हायरल झाला
नवरा-नवरी एकदम हटके स्टाईल एन्ट्री घेतात आणि एकदम मूडमध्ये येऊन डान्स करायला लागतात.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 22, 2021 | 11:15 AM
Share

कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात त्यांच्या लग्नाचा दिवस अतिशय खास असतो. आणि या क्षणाला खास बनवण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक जोमाने तयारीही करतात. मात्र, एवढं करुनही बऱ्याचदा अशा घटना घडतात, की लोक पोट धरुन हसतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. ( The bride-to-be fell while dancing at the wedding. Viral video )

सोशल मीडियावर सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यात दिसतं आहे की लग्नासाठी नवरा-नवरी खूप उत्साहित आहेत. त्यात नवरीचं काही विचारुच नका, म्हणतात ना उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, पण या व्हिडीओत नवरीच जास्त उतावीळ असल्याचं दिसतं आहे. असंच काहीसं ही नवरी करते. आणि पाहुणे मंडळी पोट धरुन हसू लागतात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी एकदम हटके स्टाईल एन्ट्री घेतात आणि एकदम मूडमध्ये येऊन डान्स करायला लागतात. हेच करता करता नवरी थेट नवऱ्याच्या पाठीवर बसते, आणि डान्स करणारा नवरा अचानक खाली कोसळतो.

तुम्हाला वाटलं असेल की, आता एवढ्या पाहुण्यांसमोर पडल्यानंतर नवरा शांत राहिल, पण असं काही नाही आहे. एवढं होऊनही नवरा थांबण्याचं नाव घेत नाही आणि जोरजोरात नाचायला लागतो. नवरी पाहून त्याला आणखीच जोश येतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ‘surprizhikayeler’ नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत आहेत. एका युजरने लिहलं, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझं मन प्रसन्न झालं. तर दुसऱ्या युजरनं लिहलं, नवरीचे एक्स्पेरशन खरंच बघण्यासारखे आहेत. तर एका युजरने लिहलं, तुम्हाला इतकं स्पोर्टिंग असलंच पाहिजे, तरच तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणू शकता.

हेही पाहा

Video : बापाने पहिल्यांदाच नवजात मुलाला मांडीवर घेतलं, आणि त्याला अश्रू अनावर झाले, भावनिक करणारा क्षण

Viral Video : बेधुंदपणे बागडणारं, फूटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू, लोक म्हणाले, ‘याला पाहून आम्ही सगळं टेन्शन विसरलो’!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली