Indian Railway : अवघ्या 3 किलोमीटरचे अंतर, लागतात केवळ 9 मिनिटं, भाडे मात्र 1255 रुपये

Indian Railway : राज्यातील या दोन रेल्वे स्टेशनमधील अंतर केवळ 3 किलोमीटर आहे. पण त्यासाठी या प्रवाशांना 1255 रुपये भाडे मोजावे लागते.

Indian Railway : अवघ्या 3 किलोमीटरचे अंतर, लागतात केवळ 9 मिनिटं, भाडे मात्र 1255 रुपये
ऐकावं ते नवलंच
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 6:42 PM

नवी दिल्ली : भारतात रेल्वेचा (Indian Railway) प्रवास सर्वात सोयीस्कर आणि स्वस्त म्हणून ओळखल्या जातो. दररोज लाखो प्रवासी एका स्थानकाहून दुसऱ्या स्टेशनवर प्रवास करतात. भाडे पण जास्त नसल्याने दूरच्या प्रवाशासाठी रेल्वेलाच अगोदर पसंती देण्यात येते. पण देशातील या छोट्या रेल्वे ट्रॅकने मात्र या स्वस्त प्रवाशाच्या संकल्पनेला छेद दिला आहे. हे दोन्ही रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातील आहेत. या छोट्या रेल्वे रुटचे (Shortest Indian Rail Route) अंतर अवघे 3 किलोमीटर आहे. साधारणपणे 9-10 मिनिटांत हा प्रवास पूर्ण होतो. पण भाडं म्हणाल तर तु्म्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. 300 किलोमीटर अंतरासाठी जेवढे भाडं द्यावे लागेल, तेवढेच भाड्या या 3 किलोमीटरसाठी मोजावे लागते.

3 किलोमीटरसाठी मोजा 1255 रुपये तर हा सर्वात छोटा रेल्वे रूट नागपूर ते अजनी (Nagpur to Ajni Railway Station) या दरम्यान आहे. दोन्ही रेल्वे स्टेशनमध्ये अवघे 3 किलोमीटरचे अंतर आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे मार्ग आहे. पण या दोन रेल्वे स्टेशनसाठी उच्च श्रेणीचे तिकीट ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. या तीन किलोमीटरसाठी प्रवाशांना1255 रुपये मोजावे लागतात.

किती आहे तिकिट ऑनलाईन ट्रेन तिकिट बुकिंग संकेतस्थळ Goibibo नुसार, नागपूर ते अजनी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान स्लीपर क्लासचे भाडे 175 रुपये आहे. जनरल तिकिट मात्र अवघे 60 रुपयांच्या जवळपास आहे. पण या दरम्यान फर्स्ट क्लास एसीचे तिकिट जर एखाद्याने बुक केले तर अवघ्या 3 किलोमीटरसाठी त्याला 1255 रुपये द्यावे लागतील. आता कोण प्रवाशी पायावर धोंडा पाडून घेईल नाही का?

हे सुद्धा वाचा

दिल्ली ते जयपूर इतके भाडे जर तुम्ही शालीमार एक्सप्रेसने दिल्ली ते जयपूर हे अंतर फर्स्ट एसीतून कराल तर तुम्हाला 1190 रुपये खर्च करावा लागेल. Goibibo नुसार, नागपूर ते अजनी या स्टेशन दरम्यान केवळ 3 किलोमीटरचा प्रवास विदर्भ एक्सप्रेसने कराल तर तुम्हाला जयपूर-दिल्लीपेक्षा जास्त 1255 रुपये खर्च करावे लागतील. तर विदर्भ एक्सप्रेसने नागपूर ते अजनी या दरम्यान थर्ड एसीचे भाडे 555 रुपये, सेंकड एसीचे भाडे 760 रुपये आहे. स्लीपर क्लाससाठी तुम्हाला 175 रुपये द्यावे लागतील.

तीन किलोमीटरसाठी खिशा कापणार नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसने तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला स्लीपर क्लाससाठी 175, थर्ड एसीसाठी 555 रुपये, सेंकड एसीसाठी 760 रुपये किराया द्यावा लागेल. महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर-अजनी दरम्यान प्रवास करत असाल तर स्लीपरसाठी 145 रुपये, थर्ड एसीसाठी 505 रुपये आणि सेंकड एसीसाठी 710 रुपये खर्च करावे लागतील.

सर्वात दूर प्रवास करणारी रेल्वे देशात सर्वात जास्त आंतर कापणारी रेल्वे विवेक एक्सप्रेस आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ते आसाममधील डिब्रुगढपर्यंत ही ट्रेन धावते. ही ट्रेन जवळपास 4300 किलोमीटरचे अंतर कापते.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.