Viral Video : आईनं नाही, तर कुत्र्यानं काठीनं मुलीला बदडलं; नेमकं झालं तरी काय?

Viral Video : आईनं नाही, तर कुत्र्यानं काठीनं मुलीला बदडलं; नेमकं झालं तरी काय?
कुत्रा

कधी कुत्र्या(Dog)ला आईसारखं मारताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही हा व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ (Video) जरूर पहा. यामध्ये एका कुत्र्यानं मुलीला बेदम मारहाण केलीय.

प्रदीप गरड

|

Jan 21, 2022 | 12:36 PM

अनेकवेळा मुलं घरात काही चुका करतात, मग तेव्हा आईला खूप राग येतो आणि त्यांना मारण्यासाठी समोर जे काही पडलेलं असेल ते उचलून प्रसाद दिला जातो. आईला राग आला, की मुलांना मारायला वेळ लागत नाही. मुलंही भीतीनं घराच्या एका कोपऱ्यात बसतात. मात्र, नंतर पुन्हा आई मायेनं जवळ घेते. मात्र कधी कुत्र्या(Dog)ला आईसारखं मारताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही हा व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ (Video) जरूर पहा. यामध्ये एका कुत्र्यानं मुलीला बेदम मारहाण केलीय.

मोबाइल कॅमेऱ्यात बनवला व्हिडिओ

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये खोलीत एक मुलगी असून ती सोफ्यावर बसलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ बनवत असल्याचं दिसून येतंय. तिथं उपस्थित असलेली काठी दातानं धरून कुत्र्यानं मुलीला मारहाण करताना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, कुत्र्याला पाहिल्यानंतर तुम्हालाही असंच काहीसं वाटेल, की तो त्याला आईप्रमाणे मारतो आहे. मुलगीही हसत हसत कुत्र्याला मारहाण करत आहे आणि तिचा मोबाइल कॅमेऱ्यात व्हिडिओ बनवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कुत्र्याचा आकार लहान असतानाही त्यानं हे काम केलं आहे.

इन्स्टाग्रामवर अपलोड

कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. doglovetreats नावाच्या अकाऊंटनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ शेकडो लोकांनी लाइक केला आहे, तर तो हजारो वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक यूझर्सनीदेखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली. एका यूझरनं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हसणारा इमोजी टाकला आहे.

चिखलात घसरू नये म्हणून काढली चप्पल; पण घडलं भलतंच… हा Viral Video पाहा, हसतच राहाल!

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…

Video : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत? पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें