तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती; काही क्षणांतच तीची इच्छा पूर्णही झाली

लॉकडाऊनमध्ये गोरगरीब लोकांसाठी मसीहा बनलेला सोनू सूद सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याने केलेल्या ट्विटला लोकांकडून खूपच पसंती दिली जाते. ही खरंतरं त्याच्या समाजसेवी मनासाठीच दाद असते. (The girl requested Sonu Sood to give her boyfriend; In a few moments, her wish came true)

तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती; काही क्षणांतच तीची इच्छा पूर्णही झाली
तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती

मुंबई : कोरोना काळात गरजूंच्या मदतीसाठी अनेक दानशूरांचे हात पुढे आले आहेत. यात काही बॉलीवूडचे सेलिब्रिटीही मागे राहिलेले नाहीत. अगदी गेल्या वर्षीपासून हे सेलिब्रिटी गोरगरीबांपर्यंत शक्य ती मदत पोहोचवत आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हाही यापैकीच एक दानशून सेलिब्रिटी. तो सध्याच्या कोरोना संकटात गरजू लोकांना सतत मदत करत असतो. त्याने केलेल्या चांगल्या कामांचे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कौतुकही होत आहे. लोक त्याच्याच हटके स्टाईलमध्ये त्यांचे आभार मानत आहेत. लॉकडाऊनमध्ये गोरगरीब लोकांसाठी मसीहा बनलेला सोनू सूद सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याने केलेल्या ट्विटला लोकांकडून खूपच पसंती दिली जाते. ही खरंतरं त्याच्या समाजसेवी मनासाठीच दाद असते. (The girl requested Sonu Sood to give her boyfriend; In a few moments, her wish came true)

सोनू सूदचा ट्विटरच्या माध्यमातून मदतीचा हात

आपल्या सर्वांना हे माहितच आहे की सोनू सूदने ट्विटरच्या माध्यमातूनही बऱ्याच लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे. सोशल मीडियातील युजर्स सोनूच्या ट्विटवर कमेंट करून मदत मागतात, परंतु काहीवेळा काही लोक अशी मागणी करतात जे वाचल्यानंतर सोनूला भारी हसूही येते. अलिकडच्या काळात असाच एक किस्सा प्रचंड व्हायरल होत आहे. हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेतल्यावर कदाचित तुम्ही पोट धरून हसत बसाल.

काय म्हणाली तरुणी?

सोनू सूदने अलिकडेच एक ट्विट केले. त्यात त्याने लिहिले आहे की, ‘मी या जमिनीशी जोडलेला मित्र आहे. खाली खेचले तरी मी तुम्हाला जमिनीवर भेटेन’. त्यावर एका मुलीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले, ‘सर एक बॉयफ्रेंड द्या प्लीज’. त्यानंतर थोड्याच वेळात एका मुलाचे उत्तर आले, ‘हा जी मॅडम, सोनू सरांनी मला पाठवले आहे’. आता दोघांचीही कमेंट खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या कमेंट्सवर लोक गमतीशीर कमेंट्स करू लागले आहेत. मुलीची मागणी पूर्ण झाली आहे, असेही काहीजण नमूद करीत आहेत. कालसुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ आंध्र प्रदेशातील होता, ज्यामध्ये लोक सोनू सूदच्या प्रतिमेला दूधाने अभिषेक घालत होते. (The girl requested Sonu Sood to give her boyfriend; In a few moments, her wish came true)

इतर बातम्या

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा, अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI