घनदाट जंगलात आरामात लपलाय जंगलाचा राजा बिबट्या, तुम्हाला दिसला का?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 06, 2021 | 12:11 PM

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. तो फोटो एका जंगल्यामधील दिसत आहे. त्यामध्ये हिरवेगार मोठं-मोठे झाडे दिसत आहेत आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे.

घनदाट जंगलात आरामात लपलाय जंगलाचा राजा बिबट्या, तुम्हाला दिसला का?
हा फोटो ट्विटरवर harsha_narasimhamurthy नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. तो फोटो एका जंगल्यामधील आहे. त्यामध्ये हिरवेगार मोठं-मोठे झाडे दिसत आहेत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. पण हा फोटो सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल का होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, या फोटोमध्ये काही बिबटे देखील आहेत आणि तेच बिबटे तुम्हाला या फोटोमध्ये शोधायचे आहेत. (The leopard, the king of the forest, is hiding in the thick forest)

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींला या फोटोमधील बिबटे शोधण्याचे चॅलेंज देत आहेत. एका नजरेमध्ये या फोटोतील बिबटे शोधण्याचे चॅलेंज सोशल मीडियावर देण्यात येत आहे. यामुळे हा फोटो जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. खरोखरच आपण जर पहिल्या नजरेमध्ये या फोटोतील बिबटे शोधले तर आपली नजर एकदम चांगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Harsha Narasimhamurthy (@harsha_narasimhamurthy)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बिबट्या शोधणे तेवढे सोप्पे काम नाही. कारण फोटोमध्ये लपलेल्या बिबट्याचा रंग आणि जंगलात असलेल्या झुडपाचा रंग एक सारखाच आहे. अगदी बारकाईने बघितल्यावर तुम्हाला बिबटे दिसण्याची शक्यता आहे. मात्र, बिबटे शोधण्यासाठी मन लावून हा फोटो बघावा लागेल. बर्‍याच लोकांना असे वाटले की, फोटोमध्ये बिबटे शोधणे सोप्पे काम आहे.

मात्र, फोटोमध्ये बिबट्या शोधण्यास सुरूवात केली, तेंव्हा समजते की, फोटोमध्ये बिबट्या शोधणे सोप्पे काम नाही. आपण लक्ष देऊन बघितले तर आपल्याला नक्की दिसेल की, जंगलातील झुडपांच्या बाजूला मोठे दगड आहेत त्यावर दोन बिबटे बसलेले आहेत. हा फोटो ट्विटर सर्वात अगोदर harsha_narasimhamurthy नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट करताना एक युजर्स म्हणाला की, फोटोमध्ये बिबटे शोधणे हे काम मला अगोदर एकदम सोप्पे वाटले. मात्र, हे खूप अवघड आहे. पण बिबटे शोधताना मजा आली.

संबंधित बातम्या : 

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

(The leopard, the king of the forest, is hiding in the thick forest)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI